Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विद्यार्थीप्रिय शिक्षक ! उत्तम वाचक - वक्ते अन् प्रगतशील शेतकरीही !!बाजार समिती एक सचिव दोन, शासकीय सचिव नियुक्तीविरोधात वळंजूची तक्रारबाजार समिती सभापती नानासो कांबळे यांचा कार्यालयीन प्रवेशसमूह विद्यापीठांनी मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे: कुलपती जिष्णू देव वर्मागोकुळमध्ये शह-काटशहाचे राजकारण! आमदारांची तक्रार, दोन दिवसात सहाय्यक निबंधकांची बदली शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून जनगणना प्रशिक्षण आयोजित करा - भरत रसाळेगोकुळमधील वाद चिघळला : प्रकाश बेलवडे यांच्या विरोधात घोषणा, दूध संस्था प्रतिनिधींचा सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चासंयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळतर्फे शिवजयंती महोत्सववेताळमाळ तालीम मंडळ ठरला सतेज चषकाचा मानकरी ! दिलबहार तालीम मंडळाला उपविजेतेपद !!विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रेंचा कार्यालयीन प्रवेश धुमधडाक्यात

जाहिरात

 

बाजार समिती सभापती नानासो कांबळे यांचा कार्यालयीन प्रवेश

schedule17 Apr 26 person by visibility 38 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात सामाजिक समता सप्ताह होत असला तरी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वीच समता प्रस्थापित केली आहे.  कोल्हापूर बाजार समितीवर सभापतीपदी नानासो कांबळे यांची निवड ही सामाजिक समतेचा संदेश आहे. बाजार समितीचा उन्नतीसाठी नूतन सभापती व  संचालकांनी चांगला कारभार करावा. ’असे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले.

 कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासो कांबळे- साकेकर यांच्या कार्यालयीन प्रवेश कार्यक्रमात बोलत होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने,'गोकुळ' चे संचालक युवराज पाटील, अमररिषसिंह घाटगे, गोकुळच्या माजी संचालिका अरुंधती घाटगे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. उपनिबंधक युसुफ शेख यांनी बाजार समितीचे सचिव म्हणून कार्यभार स्विकारला. याबद्दल त्यांचा सत्कार सभापती कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.

सभापती नानासो कांबळे म्हणाले, जिल्ह्यातील नेत्यांनी मला एका मोठ्या संस्थेवर काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे नेत्यांच्या विश्वासाला पात्र राहून  करीन व  कारभार करताना शेतकरी व व्यापारी यांचा समन्वय साधून काम करीत राहीन. अशी ग्वाही देतो.  यावेळी  संचालक सुयोग वाडकर, प्रकाश देसाई, शिवाजीराव पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमास मार्केट फेडरेशनच्या संचालिका धनश्री घाटगे,  'बिद्री' चे संचालक रणजित मुडुकशिवाले,  जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावडकर, बाजार समिती संचालक  पांडुरंग काशिद, दिलीप पोवार, कुमार आहुजा माजी जिल्हा परिषद शशिकांत खोत, संजय चितारे, 'अन्नपूर्णा शुगरचे संचालक मल्हारी पाटील, भाजप तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील,, तानाजी कुरणे, दत्तात्रय दंडवते, सुरेश मर्दाने, ज्ञानदेव पाटील, इंद्रजीत पाटील, बाळासो तुरंबे, चंद्रकांत निऊंगरे, मारुती कांबळे, आदी उपस्थित होते. उपसचिव वसंत पाटील यांनी आभार मानले 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes