विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रेंचा कार्यालयीन प्रवेश धुमधडाक्यात
schedule15 Apr 26 person by visibility 117 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेश धुमधडाक्यात झाला. पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गांधी टोप्या परिधान केलेले काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवकांची गर्दी अशा उत्साही वातावरणात गुरुवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, महापौर रुपाराणी निकम, उपमहापौरअक्षय जरग, सभागृह नेते मुरलीधर जाधव, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यालयीन प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण आदींची उपस्थिती होती.
…………………