बाजार समिती एक सचिव दोन, शासकीय सचिव नियुक्तीविरोधात वळंजूची तक्रार
schedule17 Apr 26 person by visibility 26 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शासकीय सचिवाची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकारी संस्थेतील जिल्हा उप सहकार निबंधक युसूफ शेख यांच्याकडे बाजार समितीतील शासकीय सचिवपदाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी, शेख यांना बाजार समितीच्या सचिवपदाचा पदभार घेण्याबाबतचे पत्र दिले. त्यानुसार शेख यांनी गुरुवारी, सोळा एप्रिल रोजी कार्यभार स्वीकारला. दरम्यान बाजार समितीत तानाजी दळवी हे सचिव म्हणून कार्यरत आहेत.त्यांना अद्याप पदमुक्त केले नाही. यामुळे बाजार समिती एक आणि सचिव दोन अशी स्थिती बनली आहे. तथापि बाजार समितीत शासकीय सचिव नियुक्तीचा निर्णय हा नियमबाह्य अशी तक्रार व्यापार प्रतिनिधी संचालक नंदकुमार वळंजू यांनी केले आहे. त्यांनी शासकीय सचिव नियुक्तीच्या विरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. दळवी यांना पदमुक्त न करताच नवीन सचिव नेमणे हे नियमबाह्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.