राजोपाध्येनगरात आठवडाभरात भाजी मंडई सुरू करा : शिवसेना ठाकरे गटाचे महापालिकेला निवेदन
schedule25 Nov 23 person by visibility 222 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राजोपाध्येनगर येथे येत्या आठवडाभरात भाजी मंडई सुरू करावी, अन्यथा शिवसेना ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भाजी मंडईचे उद्घाटन करुन नागरिकांची सोय करू’अशा इशारा देण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त रवीकांत आडसूळ यांना निवेदन दिले. सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रवीकिरण इंगवले, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे यांच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे यांनी नागरिकांच्या व्यथा मांडल्या.‘ उपनगरातील नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे. नागरिक व प्रशासनात संघर्ष घडू नये यासाठी तत्काळ भाजी मंडई सुरू करावी.’अशी मागणी साळोखे यांनी केली. भाजी मंडईचे बांधकाम होऊनही या ठिकाणी भाजी मंडई का सुरू केली नाही ? असा सवालही त्यांनी केला. लोकांच्या सोयीसाठी सुरू झालेली सेवा श्रेयवादात अडकू नये असेही त्यांनी निदर्शनास आणले. यावेळी महिला आघाडी उपजिल्हा संघटक स्मिता सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख मनजित माने युवराज खंडागळे, प्रशांत निकम, अनिता ठोंबरे, संगीता मुळीक, अनिल पाटील, प्रसाद कुलकर्णी, समरजित जगदाळे, विशाल चव्हाण, जयदीप पाटील, सुहास चव्हाण आदी, वर्षा पाटील, प्रतीक भोसले उपस्थित होते.