गंगावेश-पंचगंगा नदी विसर्जन मिरवणूक मार्ग सुरू करा : किशोर घाटगे
schedule26 Sep 23 person by visibility 384 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
गंगावेश ते पंचगंगा नदी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुक मार्ग पुन्हा सुरु करावा अशी मागणी सामजिक कार्यकर्ते किशोर घाटगे यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा मिरजकर तिकटी ते पंचगंगा नदी हा पारंपारिक मार्ग आहे .पण कोरोनाकाळात सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य व कोरोना प्रतिबंध म्हणून इराणी खण रंकाळा येथे गणेशमुर्तीचे विसर्जन केले. मागील वर्षापासून प्रशासनाने मिरजकर तिकटी ते गंगावेश हा नवा मिरवणूक मार्ग जाहीर केला असून गंगावेश येथे मिरवणुक संपून स्ट्रक्चर गंगावेश पंचगंगा नदीमार्गे जातात तर गणेशमुर्ती गंगावेश येथून ३ कि.मी. अंतरावरील इराणी खणीत जाते. या प्रशासनाच्या भूमिकेने मंडळांची गैरसोय होत आहे. ज्यांनी फायबर व शाडूच्या मुर्ती बसवल्या आहेत त्यांना व उत्तरेश्वर पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठेतील लहान मुर्ती बसवणाऱ्या मंडळांना हा मार्ग खुला करावा व मोठ्या व २१ फुटी गणेश मुर्तीचे विसर्जन इराणी खणीत करावे असे म्हटले आहे.