काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला करवीर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule14 Sep 23 person by visibility 376 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काँग्रेसतर्फे करवीर तालुक्यात आयोजित जनसंवाद पदयात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस कार्यकर्त्यांसह युवक-युवती, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील झाले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदयात्रा निघाली. पदयात्रेदरम्यान नेते मंडळींनी नागरिकांशी संवाद साधला. पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत झाले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सुरू असलेली जनसंवाद पदयात्रा गुरुवारी (१४ सप्टेंबर) करवीर तालुक्यात पोहोचली. प्रयाग चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जनसंवाद यात्रेस प्रारंभ झाला. प्रयाग -चिखली, आंबेवाडी वडणगे पोवार पाणंद या मार्गावरून ही पदयात्रा वडणगे या गावात पोहचल्यानंतर येथील पार्वती मंदिर चौक येथे संवाद सभा झाली.
दरम्यान पदयात्रेमध्ये गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी बाजीराव खाडे सुरेश कुराडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, राजेश पाटील, बाजार समिती सभापती भारत पाटील भुयेकर, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, सत्यजित पाटील, उदय पाटील, शिवाजी कवठेकर, सुयोग वाडकर, तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, अमर पाटील, अश्विनी धोत्रे, पैलवान संभाजी पाटील, रामकृष्ण पाटील, चिखली सरपंच रोहीत पाटील, केवलसिंग रजपूत, प्रभाकर पाटील, उतम चौगले, एम जी पाटील, राम जाधव, वडणगे माजी सरपंच सचिन चौगले, बी आर पाटील, विठ्ठल माने, रविंद्र पाटील, हंबीरराव वळके यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.