कोल्हापूरसाठी हवे विशेष पॅकेज, राजेश क्षीरसागरांची अमित शहांच्याकडे मागणी
schedule22 Jun 26 person by visibility 43 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील विविध विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधीची तरतूद करावी अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. गृहमंत्री शहा हे नुकतेच दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. आमदार क्षीरसागर यांनी सर्किट हाऊस येथे गृहमंत्री शहा यांची भेट घेऊन निवेदन दिले.
महायुतीच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहराच्या शाश्वत विकासाची पावले उचलली जात आहेत खंडपीठ, कन्व्हेन्शन सेंटर, आय.टी.पार्क, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास या प्रयोजनांच्यामुळे कोल्हापूर शहरात येणाऱ्या पर्यटक, भाविकांच्या संख्येत अगणिक वाढ होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ होवून, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत शिवाजी स्टेडियम येथे भुयारी बहुमजली पार्किंग व्यवस्था निर्माण करावा, तो पार्किंग भुयारी मार्गाद्वारे महामार्गास सलग्न करावा. जिल्ह्याला पर्यटन हबचा अधिकृत दर्जा द्यावा. कोल्हापुरास फुटबॉलसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम व अॅकॅडमी स्थापन करावी, अशा प्रमुख मागण्यांसह कोल्हापूर शहरासाठी विशेष निधीची तरतूद करावी.
खेळाडूंना कोल्हापुरातच सुसज्ज मैदान आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण प्राप्त होण्यासाठी फुटबॉल अॅकॅडमी व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम होणे आवश्यक आहे. यामध्ये ऑलिम्पिक साईज फुटबॉल मैदान, खेळाडूंचे वसतिगृह, प्रशिक्षक, संरक्षक, सुरक्षा रक्षक यांची स्वतंत्र व्यवस्था, चेजिंग रूम, गेस्ट हॉल, वाहनतळ, दोन टर्फ मैदान, दोन टेनिस कोर्ट, स्विमिंग टँक, बॉक्स क्रिकेट ग्राउंड, हॉल, जिम, गॅदरिंग हॉल आदी सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. याकरिता अंदाजे रु.३ हजार कोटी निधीची आवश्यकता आहे. तरी कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय फुटबॉल अॅकॅडमी व स्टेडियम उभारणेकामी केंद्र शासनाकडून विशेषबाब म्हणून ३ हजार कोटी निधीची मंजुरी द्यावी. , महाराष्ट्रातील या शक्तिपीठ द्रुतगती मार्ग प्रकल्पाला 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचे नाव देण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी कराव्यात, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी निवेदनांद्वारे केली आहे.