डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
schedule21 Jun 26 person by visibility 14 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळच्यावतीने 2026 घेतलेल्या परीक्षे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. विशेष प्राविण्यसह प्रथम श्रेणी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे म्हणाले, “विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे फलित आहे. गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण देण्याच्या आमच्या ध्येयाला या निकालाने अधिक बळ मिळाले आहे.” संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी म्हणाले, “विद्यार्थ्यांना सक्षम तांत्रिक व्यावसायिक बनविण्यासाठी आम्ही आधुनिक अध्यापन पद्धती आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर देत आहोत. भविष्यातही उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम ठेवण्यासाठी संस्थेचे प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहतील.” इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे म्हणाले, “तांत्रिक ज्ञानाबरोबरच उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी संपूर्ण संस्थेची टीम सातत्याने कार्यरत आहे.”