श्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93 टक्के
schedule22 Jun 26 person by visibility 19 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :
पाल, ता.भुदरगड येथील श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग डिप्लोमा विभागाचा उन्हाळी परिक्षा 2026 चा निकाल जाहीर झाला आहे. महाविद्यालयाचा यावर्षीचा निकाल 93.71% लागला असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
"परिश्रम, गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांच्या बळावर विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, हा निकाल महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे." विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून, भविष्यातही अशाच उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
कॉम्प्युटर विभागातून प्रथम हर्षिता कुरळे (93.41 टक्के), दिव्तीय अर्पिता देवर्डेकर (92.47 टक्के) तर तृतिय वेदीका पाटील (89.53 टक्के) गुण प्राप्त केलेले आहेत. एआय-एमएल विभागातून प्रथम वेदिका रेपे (83.53 टक्के), दिव्तीय कल्याणी पाटील (82.24 टक्के) तर तृतिय गौरी साठे (80.94 टक्के) गुण प्राप्त केलेले आहेत.इलेक्ट्रीकल विभागातून प्रथम सार्थक पाटील (89.77 टक्के), दिव्तीय आयन नदाफ (76.59 टक्के) तर तृतिय अभिषेक घोरपडे (71.29 टक्के) गुण प्राप्त केलेले आहेत. हर्षिता कुरळे व कु.अर्पिता देवर्डेकर यांनी अप्लाइड मॅथेमॅटिक्स परिक्षेत 100 पैकी 100 टक्के गुण प्राप्त विशेष प्राविण्य प्राप्त केलेले आहे.