+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule02 May 23 person by visibility 419 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
स्वस्थ भारत न्यासच्या वतीने संपूर्ण देशभरतील विविध आरोग्य विषयक सेवा देणाऱ्या व भरीव योगदान देणाऱ्या रुग्णालयांच्यापैकी नामांकित रुग्णालयांना देण्यात येणारा मानाचा ‘सुशीला नायर स्वस्थ भारत उत्कृष्टता पुरस्कार’ सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला स्वस्थ संसदच्या राष्ट्रीय अधिवेशनात भोपाल येथे प्रदान करणात आला.   हॉस्पिटलच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश भरमगौडर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  भोपाल येथेे कार्यक्रम झाला.  
 पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वानुसार सिद्धगिरी हॉस्पिटलच्या वतीने गेली १३ वर्ष महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील रुग्णांना सेवा देत आहे. या रुग्णसेवेची दखल घेत सिद्धगिरी हॉस्पिटलची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे स्वस्थ भारत संसदच्या समितीने सांगितले. 
भोपाळ येथे झालेल्या परिषदेचे उद्घाटन मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, पद्मश्री रामबहाद्दूर राय, मध्यप्रदेशचे आरोग्य शिक्षण मंत्री डॉ.विश्वास कैलाश सारंग, पद्मश्री मालिनी अवस्थी यांच्या उपस्थितीत झाले.
स्वस्थ भारत ही ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत संस्था असून देशात आरोग्याशी संबंधित विषयांवर जागरूकता आणणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. यासाठी विविध उपक्रमांद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यात ट्रस्ट कार्यरत असतो. गेल्या आठ वर्षांत ट्रस्टने अनेक स्थानिक उपक्रमांव्यतिरिक्त आतापर्यंत दहाहून अधिक देशव्यापी मोहिमा राबवल्या आहेत.