+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे
1000255522
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Apr 24 person by visibility 134 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांचे राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथे उत्स्फूर्त स्वागत झाले. गावकऱ्यांनी शेळेवाडी फाटा ते म्हसोबा मंदिरपर्यंत त्यांची जीपमधून मिरवणूक काढली. जेसीबीतून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.    काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगुले हे प्रचार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. राधानगरी तालुक्यात शाहू छत्रपतींना उंच्चांकी मतदान देऊ. असे हिंदुराव चौगुले यांनी सांगितले. तर शिवसेनेचे  सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, म्हणाले "आमदार प्रकाश आबिटकर यांना सगळी सत्ता आपल्या घरात राबवायचु आहे. स्वतः आमदार, भाऊ जिल्हा मध्यवर्ती बँकेला संचालक. मात्र आबिटकरांच्याकडून राधानगरी आणि भुदरगड तालुक्याचा विकास झाला नाही. हिंमत असल्यास त्यांनी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली ही जाहीरपणे सांगावे."   राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, नेते ए.वाय.पाटील, गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे, सदाशिवराव चरापले, , जनता दलाचे वसंतराव पाटील, गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंदरे, वंचित बहुजन आघाडीचे दयानंद कांबळे, सजेऺराव कांबळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सुरेश चौगुले, गोपाळराव निकम, कॉमेड सतीश कांबळे, शेकापचे दत्ता पाटील, जयसिंग पाटील, गीता पाटील, अवधूत पाटील, रंगराव पाटील, विनोद पाटील, सुशिल पाटील कौलवकर, प्रवीण पाटील, संतोष मेंगाणे, वैभव पाटील, बी.एस.पाटील आदी उपस्थित होते. निरीक्षक मधुकर रामाने उपस्थित होते. प्रचार मेळाव्याला नागरिकांची गर्दी होती.