Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वन्यजीव सप्ताह निमित्त खडके अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून  सन्मानएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी प्रा .विलास  नांदवडेकर  ग्रामीण भागांशी जोडलेलं, अनुभवी नेतृत्व ! रामचंद्र भोगमांची उमेदवारी दूध उत्पादकांना वाटतेय आपली !!मराठी अध्यापक संघातर्फे दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलनशेतकऱ्यांचा आवाज गोकुळमध्ये उमटणार, समविचारीतून बाबासाहेब देवकरांच्या उमेदवारीला उत्पादकांची पसंतीके.जी. पाटील यांना पत्नीशोकगोकुळच्या जागा पंचवीस, मागणी 29 ची ! महायुतीची मुंबईतील चर्चा निष्फळ, दोन दिवसांनी निर्णय !!समविचारी आघाडी सत्तेवर आल्यास कात्यायनी परिसरात अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्र उभारणार - आमदार सतेज पाटीलअभाविपचे विद्यापीठात आंदोलन, सुरक्षारक्षकांशी झटापटयुवराज संभाजीराजे, आमदार विनय कोरे, अमल महाडिकांना कुस्ती पोशिंदा पुरस्कार, शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन

जाहिरात

 

वन्यजीव सप्ताह निमित्त खडके अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून  सन्मान

schedule01 Oct 26 person by visibility 20 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्य सरकारच्यावतीने  2 ते 8 ऑक्टोबर 2026 या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. वन्यजीव सप्ताहाची सुरुवात राजाराम कॉलेज कोल्हापूर येथून करण्यात आली.  कार्यक्रमांमध्ये वन्यजीव सप्ताहाची सुरुवात करून कोल्हापूर जिल्ह्यातील वन अधिकारी व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था,  शाळांच्या गौरव करण्यात आला. श्री आर आर खडके अकॅडमी बोरपाडळे कडील विद्यार्थी सतत पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यातमध्ये कार्य तत्पर असतात. जंगलातील पाणवठे स्वच्छ करणे, जंगलाला लागलेली आग विझवणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, वृक्षतोड थांबविण्यासाठी आणि जंगल वाचविण्यासाठी समाज प्रबोधन करणे, शाळेकडील विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव आणि जंगल  यासाठी जनजागृती करणे, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करणे यासारख्या सामाजिक उपक्रमाचे आयोजनही केले जाते. याची दखल घेऊन श्री आर आर खडके अकॅडमी बोरपाडळेच्या विद्यार्थ्यांचा सन्मान जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य वनसंरक्षक  लक्ष्मी ए, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जास्मिन, उप वनसंरक्षक धैर्यशील पाटील, क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव  तुषार चव्हाण, विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार,  संजय वाघमोडे,  शुभांगी चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक  प्रियांका दळवी,   प्रियांका भवर,  सोनम ढोले,  विलास काळे,  स्नेहल मगर, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ सदस्य  रमण कुलकर्णी,  अमोल कुलकर्णी उपस्थित होते.  प्राचार्य डॉ. क्रांती पाटील यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes