शारंगधर देशमुखांना कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी मिळावी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत मागणी
schedule20 Oct 24 person by visibility 205 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
गेली पंधरा वर्षाहून अधिकाळ कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचे नेतृत्व करणारे माजी नगरसेवक शारगंधर वसंतराव देशमुख यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर मतदार संघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात झाली.आयर्विन मल्टिपर्पज हॉल येथे रविवारी (२० ऑक्टोबर) उत्तर मधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी हात उंचावत देशमुखांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली
माजी नगरसेवक प्रवीण केसरकर म्हणाले शारगंधर देशमुख राजकीय सामाजिक कार्यामध्ये गेली वीस वर्ष कार्यरत आहे.तसेच महापालिकेत त्यांनी काँग्रेस गटनेते,स्थायी समिती सभापती,नगरसेवक यासह अनेक महत्त्वाची पदे भूषविली असून प्रशासनामधे कामाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. माजी महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या, शहरातील अनेक प्रलंबित विकास कामांची त्यांना जाणीव असल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना उत्तरेतून उमेदवारी द्यावी.
धनंजय सावंत म्हणाले, महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व करताना देशमुखांनी कामाची मोहर उठवली आहे. माजी नगरसेवक सुजय पोतदार, माजी नगरसेविका माधुरी लाड, सुनील मोरे, दीपक पाटील, प्राचार्य जे. के. पवार, गणी आजरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक राहुल माने, अभिजीत चव्हाण, अर्जुन माने, अशोक बारामते, बाळासाहेब मुधोळकर, करण शिंदे, भैय्या शेटके,संजय कदम, अभिजीत खतकर,जहांगीर पंडत, दीपा मगदूम, शोभा कवाळे, रीना कांबळे, उदय फाळके उपस्थित होते.