+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे
1000255522
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Apr 24 person by visibility 82 categoryउद्योग
 कोल्हापूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील व्यापार उद्योग अडचणीत आले आहेत. कोल्हापुरातील कित्येक वर्ष प्रलंबित असलेले उद्योग क्षेत्राचे प्रश्न शाहू महाराज खासदार म्हणून निश्चित सोडवतील असा विश्वास कोल्हापुरातील व्यापारी उद्योजकांनी व्यक्त केला.  
    काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या बुधले हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात अनेक उद्योजकांनी केंद्र सरकारचे औद्योगिक धोरण, कर प्रणाली, छोट्या उद्योगाकडे असलेले दुर्लक्ष तसेच कोल्हापुरातील उद्योग वाढीसाठी जागा, वीजदर, रेल्वे, विमान सेवा, रस्ते, हद्दवाढ या प्रलंबित प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. 
    यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यापार उद्योग क्षेत्राची गेल्या पाच वर्षात परिस्थितीत जास्त बिघडली आहे. लोकशाहीत टिकेल की नाही अशी शंका निर्माण झाली. म्हणूनच श्रीमंत शाहू महाराज आता तटस्थ राहून चालणार नाही म्हणून पुढे आले आहेत. व्यापार, उद्योग क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी दूरदृष्टी असणारे शाहू महाराज दिल्लीत खासदार म्हणून गेले पाहिजेत. 
   माजी आमदार मालोजीराजे म्हणाले की कोल्हापूरच्या उद्योग व्यवसायाच्या प्रश्नांची शाहू महाराजांना चांगली जाण आहे. त्यांच्या अभ्यासूवृत्तीचा उद्योग क्षेत्राला निश्चितच लाभ होणार आहे. हे प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करून, तज्ञांशी चर्चा करून आपले मत व्यक्त करतात. शाहू महाराजांना कोल्हापुराचे खासदार म्हणून दिल्लीत निश्चितच मोठा मान असेल. त्यांच्या प्रत्येक कृतीचा तेथे प्रभाव पडणार आहे. म्हणूनच त्यांना दिल्लीत खासदार म्हणून पाठवावे आणि आपले उद्योग क्षेत्राचे प्रश्न मार्गी लावावे.
  आमदार जयश्री जाधव म्हणाल्या की महाराष्ट्रातील उद्योग बाहेरच्या राज्यात जात आहे त्याचा परिणाम येथील उद्योगांवर होत आहे याचा विचार उद्योजकांनी करावा. यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे यांनी केंद्र सरकार धोरण औद्योगिक क्षेत्राला अडचणीत आणणारे असल्याचे सांगितले. यावेळी आनंद माने, दिनेश बुधले रामराजे बदाले यांच्यासह अनेक उद्योजकांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाहू महाराजांना पाठिंबा दिला.
    यावेळी स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन,कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, प्रदिपभाई कापडिया, आनंद माने, राजू पाटील, भरत पाटील, सुरेश चौगुले, अजय सप्रे,संजय भगत, तौफिक मुलाणी, संजय राठोड, मोहन मुल्हेरकर, डी. डी. पाटील, भरत पाटील, सचिन शिरगांवकर, बाबासो कोळेकर नितीन दलवाई शांताराम सुर्वे सुभाष जाधव उपस्थित होते