महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक व युवा उद्योजक रौनक पोपटलाल शहा यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल अर्थात कार्यकारिणी समिती स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांनी त्यांना नेमणुकीचे पत्र दिले. महाराष्ट् चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे व्हिजन २०२७ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.या संकल्पनेसाठी आणि उद्योग, कृषी तसेच सेवा क्षेत्राच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी शहा हे योगदान देतील असे गांधी यांनी म्हटले आहे.