Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांना होणार थेट लाभजिपचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापतीसाठी नवीन वाहन, अंदाजपत्रकात चार कोटीची तरतूदजुनी पेन्शनसाठी शुक्रवारपासून आंदोलन, शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जिप अध्यक्ष- उपाध्यक्षपदी शिल्पा खोत, तानाजी पाटील बिनविरोध! काँग्रेसची माघार!!माजी विद्यार्थ्याने मिळवले यूपीएससीत यश, शाळेने केले मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागतजिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस लढविणार, अर्ज दाखलजरगनगर विद्यामंदिर बनली हायटेक शाळा, अत्याधुनिक लॅबची राज्यात महापालिकेची पहिलीच शाळाजिप अध्यक्ष - उपाध्यक्षांची नावे निश्चित ! शिल्पा खोत, तानाजी पाटलांना संधी! जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिकाबुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा

जाहिरात

 

सरोजिनी कॉलेज – अॅस्टर आधारमध्ये सामंजस्य करार, नर्सिंग कोर्स सुरू होणार 

schedule16 Dec 25 person by visibility 442 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आर. एल. तावडे फाउंडेशन, कोल्हापूर संचलित सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये शैक्षणिक व औद्योगिक सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार झाला. अभ्यासक्रमासाठी नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची मान्यता आवश्यक आहे. संबंधित सर्व मान्यता प्राप्त झाल्यानंतरच बीएस्सी (नर्सिंग) अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.अशी माहिती आर. एल. तावडे फाउंडेशनच्या सचिव श्रीमती शोभा तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अॅस्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. उल्हास दामले आणि डॉ. अजय केणी यांनी वैद्यकीय क्षेत्र झपाट्याने वाढत आहे या ठिकाणी मुला-मुलींना नर्सिंगच्या माध्यमातून नवीन संधी उपलब्ध होत आहे यासाठी अँस्टर आधार हॉस्पिटल ने मुलांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार त्यांना रोजगाराची संधी अँस्टर आधार हॉस्पिटल आणि  वेगवेगळ्या ठिकाणी  होणार आहे असे सांगितले. यावेळी डॉ. डॅलॉन फर्नाडिस, डॉ. अनिलकुमार कुलकर्णी उपस्थित होते. 

सामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना रुग्णालयीन प्रत्यक्ष अनुभव, ट्रेनिंग, इंटर्नशिप व कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी नियोजन करण्यात येणार आहेत.  या ठिकाणी आर. एल. तावडे फाउंडेशन व अँस्टर आधार हॉस्पिटल यांच्यातील हा सामंजस्य करार फार्मसी शिक्षणाला उद्योग व आरोग्यसेवा क्षेत्राशी जोडणारा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी डॉ. अरविंदकर उपस्थित होते.    

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes