सेवानिवृत्त प्राध्यापकांकडून पूरग्रस्तांना दहा लाखाची मदत
schedule05 Oct 25 person by visibility 215 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ येथील सेवानिवृत्त प्राध्यापक राम पणदूरकर यांनी ,मराठवाडा व उत्तर भारतातील अतिवृष्टीग्रस्त, बळीराजांसाठी, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीसाठी, रुपये दहा लाखची देणगी नुकतीच, पीएमओ ,साऊथ ब्लॉक दिल्ली, येथे चेक द्वारे रवाना केली. यापूर्वी, 8 मे 2025 रोजी पेहलगाम हल्ला, सिंदूर ऑपरेशनसाठी ,त्यांच्या सुविद्य पत्नी, हेमकिरण यांनी, पाच लाखाची देणगी 'राष्ट्रीय संरक्षण निधी'साठी दिली होती. त्यावेळी त्यांनी ,समाज माध्यमांसमोर ,देश परत आपत्तीत आला तर, आम्ही अजूनही मदत करू.. असे दिलेले आश्वासन फक्त पाच महिन्याच्या आत पतीने पूर्ण केले .पणदूरकर दामंपत्त्याची, एकमेव अपत्य, कन्या, कैलासवासी डॉ. रूपाली पणदूरकर यांच्या स्मृती प्रत्यर्थ ही देणगी देण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठ येथे ,65 लाख रुपयांची देणगी दिली होती. आता बळीराजासाठी दहा लाख, शिवाय इतर सामाजिक संस्थांना देणगी आणि लहान मुलींच्या शिक्षणासाठी, सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी काही लाख रुपये देणगी दिली जाते.