+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Mar 24 person by visibility 126 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तपोवन प्रभागातील रिसनं ७६२ जामसांडेकर व ७६९/२ लिंगम कॉलनी येथील खुल्या जागेतील अतिक्रमणे येत्या आठ दिवसात हटवावीत, अन्यथा महापालिकेसमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पक्षाचे माजी नगरससेवक विजय खाडे यांनी दिला आहे. खाडे यांनी यासंबंधीचे निवेदन महापालिका प्रशासनाला दिले आहे.
खाडे यांनी पत्रकात म्हटले आहे, अतिक्रमण हटविण्यासंबंधी महापालिकेकडून हलगर्जीपणा होत आहे, यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात आहे. सातत्याने तक्रारी होऊनही अतिक्रमणे का हटविले जात नाही ? तत्कालिन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी संबंधित अतिक्रमणे काढावीत असे आदेश इस्टेट ऑफिसर व अतिक्रमण विभागप्रमुख सचिन जाधव यांना दिले होते. मात्र जाधव यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. याप्रश्नी त्यांची चौकशी व्हावी व त्यांना बडतर्फे करावे. या खुल्या जागेच्या सात/बाराला अथवा प्रॉपर्टी कार्डला महापालिकेचे नाव लावावे असे पत्र प्रशासनाला देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.