Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात दोन दिवसीय कंदमुळे-औषधी वनस्पतींचा उत्सवकोल्हापूरचे विमानतळ जगाच्या नकाशावर नेणारा खासदार सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव शुक्रवारपासून, तीन दिवस सांगितीक मेजवानीएसटीच्या जागेवर प्रत्येक जिल्हयात रुग्णालय, कोल्हापूर, पुण्यातील रुग्णालयासंबंधी सादरीकरण अधिकारी-कर्मचाऱ्यांची क्रिकेटची सामने, संतोष जोशी, अतुल आकुर्डे, सचिन सांगावकरांनी लुटला फलंदाजीचा आनंदसुरेंद्र जैन परिवारातर्फे सीपीआरला एक हजार चष्मे प्रदानश्री.आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रमआंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संवाद, तरुण खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप ! कोल्हापूर बॅडमिंटनचा सुवर्णसोहळा !!व्यापारी-उद्योजकांमध्ये शुक्रवारपासून रंगणार क्रिकेट सामनेकेडीसीसी बँकेच्या २५ अधिकाऱ्यांना व्यवस्थापक-उपव्यवस्थापकपदी बढत्या

जाहिरात

 

भाजपतर्फें राहुल गांधींचा निषेध, काँग्रेसचे पोटातले ओठावर

schedule13 Sep 24 person by visibility 207 categoryराजकीय

 
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंबंधी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्ष, कोल्हापूरतर्फे निषेध करण्यात आला. बिंदू चौक येथे निदर्शने करण्यात आली. 
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी,  ‘राहुल गांधींचा धिक्कार असो, आरक्षण रद्द करू पाहणाऱ्या राहुल गांधीचा धिक्कार असो,  डॉ बाबासाहेब यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार असो’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल चिकोडे, सत्यजित कदम, नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर, माणिक पाटील-चुयेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, राहुल गांधी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा भाजपा कोल्हापूरच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. संविधानाच्या सन्मानासाठी भाजपा मैदानात उतरली आहे. जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मागासवर्गीयांना दिलेले आरक्षण हे कोणीही संपवू शकत नाही. गेल्या लोकसभेमध्ये भाजपला चारशे जागा कशासाठी पाहिजे आहेत, तर आरक्षण रद्द करण्यासाठी पाहिजे आहेत असा खोटा आरोप ज्या काँग्रेसने केला त्या काँग्रेसचा खरा चेहरा आता जनतेसमोर येत आहे. काँग्रेसचे पोटातले ओठावर आले. 
  यावेळी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, सत्यजित कदम, हेमंत आराध्ये यांनी  मनोगत व्यक्त केले. आंदोलनात सरचिटणीस डॉ राजवर्धन, डॉ. आनंद गुरव, राजू मोरे, अप्पा लाड, भरत काळे, अतुल चव्हाण, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, अभिजित शिंदे, गिरीष साळोखे, संदीप कुंभार, दिलीप मेत्राणी, किरण नकाते, अनिल कामत, प्रकाश घाटगे, राहुल सोनटक्के, सचिन आवळे, रविकिरण गवळी, दिलीप बोंद्रे, ओंकार गोसावी, रणजीत औंधकर, बंकट सूर्यवंशी, सुमित पारखे, सतीश आंबर्डेकर, महेश यादव, सचिन घाटगे, संजय पाटील, शिवाजी बुवा, योगेश साळोखे, सनी आवळे, सतीश रास्ते, नरेंद्र पाटील, सुधीर बोलावे, प्रशांत अवघडे, महेश चौगले, प्रमोद कांबळे, भगवान काटे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes