ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिरात विद्याधिपती रुपातील पूजा
schedule28 Feb 24 person by visibility 286 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या उमा टाॅकीज ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिरात आज बुधवारी संकष्टी चतुर्थीला मराठी राज्य भाषा दिनाचे औचित्य साधून "श्री विद्याधिपती" रूपातील पूजा बांधण्यात आली आहे.
काल मंगळवारी मराठी राजभाषा दिन साजरा झाला. या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिरात गणरायाची विद्यार्थी रूपातील पूजा बांधण्यात आली आहे. गणराय शाळकरी मुलीला मांडीवर बसून मराठी पुस्तक वाचत आहे तर दुसरा विद्यार्थीही मराठी पुस्तक घेऊन वाचन करत आहे .तसेच दोन फरशीच्या पाट्यावर 'श्री', 'अ' अशी अक्षरे लिहिली आहेत. तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात मुळाक्षरे रेखाटण्यात आली आहेत. मंदिराचे पुजारी सागर भोरे, आकाश गुरव, आणि केतन पायमल यांनी पूजा बांधली आहे.