श्रीपतरावदादा बँकेला सव्वातीन कोटीचा नफा ! यंदा दहा टक्के लाभांश !!
schedule26 Sep 23 person by visibility 260 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्रीपतरावदादा बँकेला आर्थिक वर्षात सव्वातीन कोट रुपयांचा नफा झाला आहे. बँकेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार पी. एन. पाटील यांनी दिली.
श्रीपतरावदादा सहकारी बँक, राजीवजी सहकारी सूत गिरणी व निवृत्ती तालुका खरेदी विक्री संघ या संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. फुलेवाडी येथील अमृत मंगल कार्यालय येथे सभा झाल्या. याप्रसंगी बोलताना आमदार पाटील म्हणाले, ‘अडचणीतील सूतगिरण्यांना राज्य सरकारने प्रोत्साहपर धोरण राबवून अनुदान द्यावे. वीजदर व कच्चा मालाची टंचाई यामुळे सूतगिरण्यासमोर अडचणी आहेत. त्यांना प्रतियुनिट पाच रुपये दराने वीजदरात सवलत मिळावी. प्रती चाती पाच हजार रुपये कर्ज मंजूर करुन व्याज सरकारने भरावे.’
श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्ष राजेश पी. पाटील-सडोलीकर यांनी बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व विविध घटकासाठी योजना राबविल्याचे सांगितले. राजीवजी सूतगिरणीची सभा अध्यक्ष राहूल पाटील-सडोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली तर निवृत्ती तालुका खरेदी विक्री संघाचे सभेच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब माने होते. याप्रसंगी सूतगिरणीचे उपाध्यक्ष पांडूरंग पाटील, बँकेचे उपाध्यक्ष गणपतराव पाटील, संघाचे उपाध्यक्ष बी. एच. पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, पी. डी. धुंदरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर, माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, भोगावती कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर उपस्थित होते.