Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात काँग्रेस चालवतो शिवसेना ठाकरे पक्ष, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्ट्रक्चरल इंजिनियर्सतर्फे शनिवारी एकदिवसीय कार्यशाळा महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर, काँग्रेसकडून निवडीसंबंधी महापौरांना पत्रकुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधीसमृद्ध शाळा - समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यासाठी आदर्शवत, जिल्हा नियोजन समितीत गौरवोद्गगारकोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळ – संध्याकाळच्या सत्रात विमानसेवा, दोन मार्चपासून प्रारंभमेन राजारामच्या विद्यार्थिनींनी जिंकली राज्यस्तरीय स्पर्धा ! पालकमंत्र्यांनी केले कौतुक, जिल्हा प्रशासनाने दिले बक्षीस!!शाहू मिलच्या डेव्हलपमेंटसंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक - पालकमंत्री प्रकाश अबिटकर सार्थक क्रिएशन्सच्या रौप्यमहोत्सवानिमित्त गुरुवारी विशेष कार्यक्रम, मान्यवरांचा सन्मान होणारअंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने, अन्यथा  गुरुवारपासून कामबंद आंदोलन

जाहिरात

 

कुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधी

schedule11 Feb 26 person by visibility 17 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :  कुंभोजगिरी - कुंभोज येथे उभारण्यात आलेले सरस्वती साधना केंद्र येथे उभारलेले दुर्मिळ ग्रंथ संपदेचे ग्रंथालय हे प्राचीन भारतीय संस्कृती जपण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम असल्याचे प्रतिपादन जैन विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

सरस्वती साधना केंद्राचे उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक या नात्याने बोलताना ललित गांधी यांनी या साधना केंद्रामध्ये भारतातील अति प्राचीन अशा ब्राम्ही, शारदा, कुटील, देवनागरी, मल्याळी, कन्नड अशा लिपीमध्ये दुर्मिळ ग्रंथांच्या पुनर्लेखनासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सहकार्य केले जाईल असे सांगितले.

आचार्य रैवतसुरीजी, साध्वी शीलवतीश्रीजी, साध्वीजी प्रज्ञाभारती सरस्वतीश्रीजी, साध्वीजी उदयप्रभाश्रीजी आदि अनेक साधु-साध्वींच्या प्रमुख उपस्थितीत आनंद स्मृति ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र बोहरा (पूणे), अरूण ललवाणी, नरेंद्र जैन, मोहनलाल ओसवाल, अभय गांधी, सुभाष शहा, चंपकभाई शहा, अमृतभाई शहा, माणकचंद लालवाणी आदि विविध समाज अग्रणींसह उपजिल्हाधिकारी जीनल पालरेचा यांच्यासह देशभरातुन आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साध्वी प्रज्ञाभारती सरस्वतीश्रीजी यांच्या विशेष प्रेरणा व मार्गदर्शनाने स्थापित या साधना केंद्रामध्ये साध्वीजी सरस्वतीश्रीजी यांनी स्वतः आठ लिपीमध्ये लिहीलेली दुर्मिळ ग्रंथ संपदा यानिमित्ताने प्रदर्शित करण्यात आली आहे.साधना केंद्रामध्ये नवनिर्मित सरस्वती मंदीरामध्ये सरस्वतीच्या प्राचीन ग्रंथात वर्णवलेल्या नऊ वेगवेगळ्या मुद्रांमधील सरस्वती मूर्तींची प्रतिष्ठापना शुक्रवार तेरा फेब्रवारी रोजी होणार आहे. पाच दिवस चालणार्‍या या महोत्सवासाठी देशाच्या विविध भागातुन साधु-साध्वी-संत, जैन समाज अग्रणी मोठ्या संख्येने कुंभोजगिरी तिर्थावर दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकारचे हे पहिलेच सरस्वती साधना केंद्र बनले असुन भाविकांनी, ज्ञान साधकांनी व प्राचीन संस्कृती अभ्यासकांनी याठीकाणी अवश्य भेट द्यावी असे आवाहनही ललित गांधी यांनी याप्रसंगी केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes