महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर, काँग्रेसकडून निवडीसंबंधी महापौरांना पत्र
schedule11 Feb 26 person by visibility 26 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश भरत लाटकर यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने बुधवारी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेऊन यासंबंधीचे पत्र दिले. यावेळी उपमापोर अक्षय जरग उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे एकूण ३४ नगरसेवक निवडून आले आहेत. पक्षाने गटनेतेपदी बोंद्रे यांची निवड यापूर्वी केली आहे. बुधवारी, पक्षाच्या नगरसेवकांनी, महापौरांची भेट घेऊन काँग्रेस पक्षातर्फे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी लाटकर यांची निवड केल्याचे कळविले. शिष्टमंडळात नगरसेवक सुभाष बुचडे, पुष्पा नरुटे, रुपाली पोवार, सचिन चौगले, स्वाती कांबळे, विशाल चव्हाण, दिपाली घाटगे, विनायक कारंडे, स्वाती यवलुजे, अर्जुन माने, प्रतापसिंह जाधव, ऋग्वेदा माने, प्रशांत खेडकर, जयश्री चव्हाण, स्वालिया बागवान, अनुराधा मुळीक, प्रविण सोनवणे, दिलशाद मुल्ला, अमर समर्थ, विनय फाळके, रोहित कवाळे, संजय मोहिते, उमेश पोवार, धनश्री कोरवी, अर्चना बिरांजे,सचिन शेंडे, शुभांगी पाटील, प्रविण केसरकर, अरुणा गवळी, दुर्वास कदम, सुषमा जरग, जयशी कांबळे, आदी उपस्थित होते, काँग्रेसकडून लाटकर यांची निवड झाल्यामुळे आता महापौरांकडून प्रशासनाला विरोधी पक्षनेते निवडीसंबंधीचे पत्र व त्यांना सेवा सुविधा देण्याबाबत पत्र दिल जाते.