Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात काँग्रेस चालवतो शिवसेना ठाकरे पक्ष, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्ट्रक्चरल इंजिनियर्सतर्फे शनिवारी एकदिवसीय कार्यशाळा महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर, काँग्रेसकडून निवडीसंबंधी महापौरांना पत्रकुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधीसमृद्ध शाळा - समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यासाठी आदर्शवत, जिल्हा नियोजन समितीत गौरवोद्गगारकोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळ – संध्याकाळच्या सत्रात विमानसेवा, दोन मार्चपासून प्रारंभमेन राजारामच्या विद्यार्थिनींनी जिंकली राज्यस्तरीय स्पर्धा ! पालकमंत्र्यांनी केले कौतुक, जिल्हा प्रशासनाने दिले बक्षीस!!शाहू मिलच्या डेव्हलपमेंटसंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक - पालकमंत्री प्रकाश अबिटकर सार्थक क्रिएशन्सच्या रौप्यमहोत्सवानिमित्त गुरुवारी विशेष कार्यक्रम, मान्यवरांचा सन्मान होणारअंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने, अन्यथा  गुरुवारपासून कामबंद आंदोलन

जाहिरात

 

समृद्ध शाळा - समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यासाठी आदर्शवत, जिल्हा नियोजन समितीत गौरवोद्गगार

schedule11 Feb 26 person by visibility 30 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या सर्व शाळांकरिता राबविण्यात येत असलेली समृद्ध शाळा व ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवाविषयक समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान राज्यासाठी आदर्शवत ठरत आहे असे गौरवोद्गार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपन्न झाली. बैठकीपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी यांनी विषयसूचीचे वाचन केले. मागील बैठकीतील विषयांच्या अनुपालनाचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला व त्यावर सविस्तर चर्चा झाली.

दरम्यान सभेत बोलताना मंत्री आबिटकर यांनी, मंजूर निधीचा प्रभावी आणि पारदर्शक वापर करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सर्व विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करावीत अशा सूचना केल्या. मंजूर असलेला सर्व निधी मार्च अखेर खर्च व्हावा, तसेच ज्या विभागांना अतिरिक्त निधीची गरज आहे त्यांनी प्रस्ताव सादर करावेत, सहपालकमंत्री मिसाळ यांनी केली. बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमल महाडीक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, उपायुक्त (नियोजन) संजय मरकळे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख  उपस्थित होते. यावेळी श्री अंबाबाई मंदिर व श्री जोतिबा विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. तर  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या सर्व शाळांकरिता समृध्द शाळा योजना २०२५-२६ राबविण्यात आली. या करिता रूपये ६४  कोटी निधी देण्यात आला. मागील वर्षीपेक्षा निधीमध्ये १२८.०० टक्के वाढ झाली. यामध्ये २०२५-२६ मध्ये २१३ इतक्या शाळांचा समावेश आहे. २०२६-२७ मध्ये इतकाच निधी देण्याचे प्रयोजन आहे. समृध्द प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत २०२५-२६ मध्ये २२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजूरी दिली. या करिता रूपये ११.७९ कोटी निधी देण्यात आला. २०२६-२७ मध्ये ४० प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता रूपये १६.०० कोटी देण्यात येणार आहेत. तसेच अंगणवाडी केंद्रही अद्ययावत करण्यात येत आहेत. या सुरु असलेल्या प्रकल्पाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी बैठकीत दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes