+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust शाळा, मोबाईल शॉपीमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना अटक adjustअण्णा मोगणे संघाने जिंकला आमदार यादव चषक adjustशिवाजी विद्यापीठाच्या टेनिस पुरुष संघाने चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली adjustशहाजी कॉलेजतर्फे आंतरमहाविद्यालयीन निबंध-वक्तृत्व स्पर्धा adjust युवतीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला पाच वर्षे सक्त मजुरी adjustशरद पवार गटाचे कोल्हापूर दक्षिणमध्ये घरोघरी राष्ट्रवादी अभियान adjustदक्षिणमध्ये २४ हजार लाभार्थ्यांना स्वखर्चातून आयुष्मान भारत कार्ड देणार- अमल महाडिक adjustज्या क्षेत्रात काम करताय त्यावर मनापासून प्रेम आवश्यक -स्पृहा जोशी adjustभाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी शाहरुख गडवाले adjustजिल्हा पोलिस अधीक्षकांची गोकुळला सदिच्छा भेट
Screenshot_20231123_202106~2
schedule04 Oct 22 person by visibility 424 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी रविवारी (ता.9 ऑक्टोबर) कोल्हापुरात नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने लवटे यांच्या साहित्य, विचार व कार्यावर आधारित नऊ ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे अशी माहिती नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी.पी. माळी व सचिव विश्वास सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे दुपारी चार वाजता कार्यक्रम होणार आहे.
 संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तर पंतप्रधानांचे भाषा सल्लागार आणि हिंदी विषयाचे राष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ लेखक डॉ. दामोदर खडसे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. या सोहळ्यात लवटे यांना मानपत्र,  मानचिन्ह देऊन सहपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. तसेच लवटे यांच्या जीवन कार्यावर आधारित माहितीपट सभागृहात दाखविण्यात येणार आहेत. नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने डॉ
 लवटे यांच्या विचार व कार्यावर नऊ ग्रंथांचे लेखन झाले आहे. सत्कार समारंभावेळी डॉ‌. जी. पी. माळी संपादित डॉ.सुनीलकुमार लवटे : साहित्य समीक्षा, विश्वास सुतार संपादित डॉ. सुनीलकुमार लवटे : बहुविध संवाद, डॉ.अर्जुन चव्हाण संपादित डॉ. सुनीलकुमार लवटे : अमाप माणूस या तीन ग्रंथांचे प्रकाशन होईल.
 डॉ. लवटे यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे जमणार आहे. नाट्यगृह व परिसरात मिळून जवळपास दीड हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय डॉ. लवटे यांच्या साहित्य संपदेचे प्रकाशकांच्यावतीने स्टॉल लावण्यात येणार आहेत. तसेच दळवीज आटऺसच्या विद्यार्थ्यांचे डॉ‌. लवटे यांच्या भावमुद्रा रेखाचित्र प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला नागरी सत्कार समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य राजेखान शानेदिवाण, खजिनदार प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव प्रा. सी.एम. गायकवाड, मिलिंद यादव. सागर बगाडे, प्रकाशक अमेय जोशी, अनिल म्हमाणे,  भाग्यश्री पाटील-कासोटे आदी उपस्थित होते.