गोकुळतर्फे पी.एन.पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
schedule21 May 24 person by visibility 529 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी.एन.पाटील यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आमदार पाटील यांची प्रकृती सुधारावी व यातून लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी गोकुळ परिवारामार्फत गोकुळच्या ताराबाई पार्क येथील हनुमान मंदिरामध्ये अभिषेक घालून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक एस. व्ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे, बी.आर.पाटील, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.किटे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अशोक पुणेकर, विनोद वानखेडे तसेच संघाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.