+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustभारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना गोकुळमार्फत अभिवादन adjustसंयमाला मर्यादा,२४ तासात हल्ले थांबवा ! नाही तर मी बेळगावमध्ये जाणार !! adjustबेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड, सीमावाद चिघळला adjustराजेश क्षीरसागर फौंडेशनतर्फे सौंदतीत भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा-अल्पोपहार वाटप. adjustकोल्हापुरात जानेवारीत निमंत्रितांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धा adjustडॉ. जयसिंगराव पवार यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान adjustपॅरा ओपन टेबल टेनिस स्पर्धेत विवेक मोरे तृतीय adjustशाहू गोल्ड कप, फुटबॉल अॅकॅडमीची मालोजीराजेंकडून घोषणा adjustमालोजीराजे, मधुरिमाराजे यांच्या हस्ते केएसए लोगोचे अनावरण adjustशिक्षक बदलीसाठी संदर्भ दिनांक ३० जून २०२३ गृहीत धरावा ! पुरोगामी शिक्षक संघटनेच्या राज्य सभेत ठराव !!
Maharashtra-News-1IMG-20200920-WA0002
schedule21 Aug 22 person by visibility 393 categoryलाइफस्टाइल
 हॉटेल रॉयल व्हेनिशियनच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त खवय्यांसाठी चटकदार मेजवानी
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : चोखंदळ खवय्यांसाठी चटकदार डिशेसची मेजवानी, उच्च दर्जाचा इंपोर्टेड चिजचा व्हेज व नॉनव्हेज पिझ्झा फेस्टिव्हल, मटण रान, मटका हैद्राबादी दम बिर्याणी अन् कबाब फॅक्टरी हे सारं काही कोल्हापुरात मिळणारे ठिकाण म्हणजे, हॉटेल रॉयल व्हेनिशयन !
शिरोली एमआयडीसी शिये फाटा येथील हॉटेल रॉयल व्हेनिशयन हे खवय्यांचे आवडंत आणि हक्काचं हॉटेल बनले आहे. तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त हॉटेल रॉयल व्हेनिशयनने खास ग्राहकांसाठी वेगवेगळया डिशेस उपलब्ध केल्या आहेत. विशेष करुन २० ऑगस्टपासून सुरू केलेला पिझ्झा फेस्टिव्हल खवय्यांच्या पसंतीस उतरला आहे. वुडफायर्ड इटालियन पिझ्झाची चव चाखण्यासाठी पावले वळत आहेत.उच्च दर्जाचा व इंपोर्टेड चिजचा व्हेज व नॉनव्हेज पिझ्झा वेगळे आकर्षण आहे.
हॉटेल रॉयल व्हेनिशयनने ग्राहकांच्या आवडीनिवडीला प्राधान्य देत चटकदार डिशेस उपलब्ध केल्या आहेत. हॉटेल रॉयल हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, निसर्गरम्य वातावरण आणि येथील सुसज्ज वातानुकूलित बॅन्क्वेट हॉल. शाकाहारी व मांसाहारी पदार्थांच्या चवदार डिशेस ही येथील खासियत आहे. लाजवाब मटण रान, मटका हैद्राबादी दम बिर्याणी, कबाब फॅक्टरी यामुळे चवीने खाणार तो हॉटेल रायॅल व्हेनिशयनला प्राधान्य देणार असे हॉटेल व्यवस्थापनचा दावा आहे
. व्हेनिशयन पब हे येथील आणखी एक वैशिष्ट्य असल्याचे व्यवस्थापनने म्हटले आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत व्यवस्थापनने उच्चतम दर्जा आणि ग्राहकाभिमुख सेवा याचा मिलाफ साधला यामुळे अल्पावधीतच येथील एकापेक्षा एक चवदार पदार्थ आणि डिशेसमुळे सर्वांच्या तोंडी आज हॉटेल रॉयल व्हेनिशयनचे नाव असल्याचे म्हटले आहे.