+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपुराचे पाणी कोल्हापूर शहरात ! पूरस्थितीबाबत मुख्यमंत्र्याची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा !! adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule10 Mar 21 person by visibility 1483 categoryसंपादकीय
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील विविध माध्यमात कार्यरत कलाकार व कलाप्रेमींनी एकत्र येऊन चित्रतपस्वी भालजी पेंढारकर फिल्म सोसायटी’स्थापन केली आहे.लोक उत्कर्ष समिती संचलित या फिल्म फेस्टिव्हलतर्फे रविवारी, ता. १४ मार्च रोजी ‘शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन केले असल्याची फिल्म सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. फेस्टिव्हल पाहण्यासाठी विनामूल्य आहे.
दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल होत आहे. फेस्टिव्हलसाठी ४२ शॉर्ट फिल्मची नोंदणी झाली आहे. दिवसभरात निवडक २७ शॉर्टफिल्म दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, तेलगू अशा विविध भाषेतील शॉर्टफिल्मचा समावेश आहे.
सायंकाळी ६.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट तीन शॉर्ट फिल्मना ‘चित्रतपस्वी चित्रदर्शी आणि कलासक्त’तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, पटकथा, छायाचित्रण, संकलन, पार्श्वसंगीत अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि ‘गोकुळ’दूध संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण समारंभ आहे. पत्रकार परिषदेला फिल्म सोसायटीचे दीपक बिडकर, शिरीष हुपरीकर, महेश गोटखिंडीकर, विश्वराज जोशी, सागर वासुदेवन, विवेक मंद्रुपकर, केदार मुनीश्वर उपस्थित होते.
……………..
चित्रपट विषयक कार्यशाळा
चित्रतपवी भालजी पेंढारकर फिल्म सोसायटीतर्फे चित्रपट कसा पाहावा, चित्रपटाची विविध अंगे, पटकथा लेखन यासंबंधी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
…………………………
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या सिनेमातील गीत-नृत्यावर बॅले
नृत्यदिग्दर्शक दीपक बीडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अॅकेडमीचे कलाकार चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या सिनेमातील गीत,नृत्यावर आधारित पंधरा मिनिटाचा ‘बॅले’कार्यक्रम सादर करणार आहेत. गीत, संगीत व नृत्यातून हा कार्यक्रम उलगडणार आहे. तसेच भालजींच्या सिनेमातील काही दृश्ये चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहेत.
…………