महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खासदार शाहू छत्रपती यांच्याकडून पॅरिस ऑलम्पिक पदक विजेत्या नेमबाजपटू स्वप्नील कुसाळेला एक लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले. कुसाळे याने पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत ५० मीटर रायफल शूटिंगमदये कास्यपदक मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव जगभर केले.
रविवारी खासदार श्री छत्रपती शाहू महाराज यांनी स्वप्नील याच्या कांबळवाडी येथे घरी भेट देऊन आई-वडिलांसह परिवाराचा सत्कार केला. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे,वसंत पाटील बापु, सदाशिव चरापले, पांडुरंग भांदीगरे, रवी पाटील, संदीप पाटील, दत्तात्रय चौगले, मिथुन पारकर, राकेश केरकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.