गंगावेस येथील बाजारपेठेत ओमनी कार घुसली ! भाजी विक्रेती महिला ठार, दोघी जखमी !!
schedule14 Oct 25 person by visibility 965 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : वडाप वाहतूक करणारी ओमनी कार मंगळवारी (14 ऑक्टोबर 2025) गंगावेश येथील बाजारात घुसली. यामध्ये एक भाजीविक्रेता महिला ठार झाली. तर दोघी जखमी झाल्या. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी या घटनेचा पंचनामा करत आहेत. गंगावेस परिसरातील शाहू उद्यानलगच्या बाजारपेठेत सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ग्रामीण भागातून आलेल्या महिला या ठिकाणी भाजी विक्री करतात. येथील बाजारपेठ सुरू असताना ओमनी कार भरधाव वेगात आली. वाहन चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. या वाहनाखाली एक महिला सापडली. यामध्ये त्या भाजीविक्रेत्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघी जखमी आहेत. या घटनेने या भागात भीतीदायक वातावरण निर्माण झाले. भाजीपाला खरेदीसाठी या ठिकाणी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.