Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप आरक्षणात उलटफेर ! इंगवले, घाटगे, महाडिक, निंबाळकर, पाटील, मगदूमांना धक्का !!जिपचे आरक्षण जाहीर, भुदरगड-चंदगडमध्ये महिलाराज ! हातकणंगलेत सहा एससी प्रवर्गराज्यस्तरीय आंतरविभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा उत्साहातकेशवराव भोसलेंनी संगीत-नाट्यकला समृद्ध केली, त्यांच्या नावाचा पुरस्कार ऊर्जा देणारा- अभिनेते विक्रांत आजगावकररंकाळयाचे नुकसान करू नका, तलावाचे सौंंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच ! राजेश क्षीरसागर…तरच चंदेरी दुनियेत या ! अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनी साधला तरुणाईशी संवादखाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे समाजभान, दिव्यांगांनी उत्पादित वस्तूंचे सभासदांना वाटपस्थानिक स्वराज्य संस्थेत युतीचे अधिकार स्थानिक पातळीवर ! शक्य असेल तिथं युती, शक्य नसल्यास स्वतंत्र !!-देवेंद्र फडणवीसशाहू स्मारक भवनमध्ये उलगडलाय लेफ्टनंट जनरलांचा झुंझार इतिहासडीवाय पाटील अभियांत्रिकीमध्ये करिअर डेव्हलपमेंट -प्लेसमेंट सेल

जाहिरात

 

जिपचे आरक्षण जाहीर, भुदरगड-चंदगडमध्ये महिलाराज ! हातकणंगलेत सहा एससी प्रवर्ग

schedule13 Oct 25 person by visibility 66 categoryजिल्हा परिषद

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद मतदार संघासाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये काही जणांना सुखद धक्का बसला तर काही जणांचा हिरेमोड झाला. चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील प्रत्येकी चारही मतदारसंघांमध्ये महिलांच्यासाठी आरक्षण पडले आहे तर हातकणंगले तालुक्यातील अकरापैकी जिल्हा परिषदेचे सहा गट हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. मतदार संघातील आरक्षण बदलल्यामुळे  गेल्या सभागृहातील काही पदाधिकारी व कारभारी सदस्यांनाही फटका बसला. जिल्हा परिषदेच्या एकूण 68 जागेपैकी 21 जागा या सर्वसाधारण गटासाठी, 19 जागा या सर्वसाधारण महिला गटासाठी जाहीर झाल्या. ओबीसी प्रवर्गासाठी एकूण 18 जागा असून त्यापैकी नऊ जागा या महिला ओबीसी प्रवर्गासाठी आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी नऊ जागा आरक्षित आहेत. त्यापैकी पाच जागेवर महिला प्रवर्गाचे आरक्षण आहे तर अनुसूचित जमाती या प्रवर्गातून नांदणी येथील जागा महिला प्रवर्गासाठी आरक्षित जाहीर झाली. 
 सोमवारी 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराने सभागृह येथे आरक्षण सोडत निघाली जिल्हाधिकारी अमोल शेडगे व उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सोडत प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातील आरक्षणाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. पहिल्यांदा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली अनुसूचित जाती प्रवर्ग आरक्षित गट-मतदारसंघात भादोले, आळते, रुकडी, रुई, कबनूर , पटणकोडोली, दानोळी, अब्दुललाट आणि कसबा सांगाव या गटाचा समावेश आहे.यामध्ये अनुसूचित जाती महिलासाठी दानोळी, भादोले, अब्दुललाट,आळते, कसबा सांगाव हे पाच गट आरक्षित झाले.तर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी नांदणी हा गट आरक्षित झाला आहे. ओबीसी अर्थात नागरिकांचा ईतर मागासवर्ग प्रवर्ग अंतर्गत 18 गट आरक्षित आहेत. यामध्ये नऊ गट ओबीसी महिलांसाठी आरक्षित जाहीर झाले. महिला ओबीसीसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघात कागल तालुक्यातील सेनापती कापशी, सिद्धनेर्ली, शिरोळ तालुक्यातील यड्राव, पन्हाळा तालुक्यातील कोतोली, चंदगड तालुक्यातील माणगाव, हातकणंगले तालुक्यातील घुणकी,  चंदगड तालुक्यातील तुडये, भुदरगड तालुक्यातील आकुर्डे आणि पन्हाळा तालुक्यातील कळे या मतदारसंघात आता महिला ओबीसी उमेदवार लढतील. तर नागरिकांचा ओबीसी प्रवर्गासाठी उदगाव,  शिरोली,  शिये,  कसबा नूल, सरूड , कसबा वाळवे,  मुडशिंगी, म्हाकवे, बांबवडे हे मतदार संघ आरक्षित जाहीर झाले.
सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असलेल्या 19 गटामध्ये कोरोची, कसबा तारळे, कुदनुर, कळंबे तर्फ ठाणे, शिंगणापूर, कुंभोज, गिजवणे, येवलूज, कागल तालुक्यातील चिखली, गारगोटी, बोरवडे, आंबर्डे. आडसूळ,  कडगाव,  पिंपळगाव,  दत्तवाड, सरवडे, तिसंगी आणि सांगरूळ या मतदारसंघाचा समावेश आहे
 सर्वसाधारण गटासाठी एकूण 21 मतदारसंघ आहेत. यामध्ये उचगाव, रेंदाळ,  पेरणाली,  सातवे, राशिवडे बुद्रुक  पाचगाव, भडगाव,  असळज, हलकर्णी, करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द, सडोली खालसा,  कोडोली,   शितूर तर्फ वारुळ,  उत्तूर, पोरले तर ठाणे,   गोकुळ शिरगाव, राधानगरी, आलास, नेसरी निगवेखालसा, वडणगे मतदार संघाचा समावेश आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes