राज्यस्तरीय आंतरविभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा उत्साहात
schedule13 Oct 25 person by visibility 21 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट, कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरविभागीय निवड चाचणी २०२५ क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठाचे ४९ वे मठाधिपती परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामी आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये नाशिक, पुणे, नागपूर अशा अनेक जिल्ह्यातील वैद्यकीय व नर्सिंग संस्थांमधील विद्यार्थी सहभागी होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ. देवेंद्र पाटील, राजकुमार पाटील, एम डी पाटील, विजय सनगर, यशोवर्धन बारामतीकर, गुंडोपंत वड, विवेक शेट्ये, निशांत पाटील उपस्थित होते. पालकमंत्री आबिटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘खेळ केवळ जिंकण्यासाठी नसून शिस्त, मेहनत आणि संघभावना शिकवणारी जीवनशैली आहे. डॉक्टर आणि नर्सिंग विद्यार्थी म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी खेळ हा आपल्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग असला पाहिजे.’ क्रीडा स्पर्धांमध्ये अॅथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, भालाफेक, उंच उडी अशा विविध प्रकारांचा समावेश होता. विवेक सिद्ध यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वर्षा पाटील यांनी आभार मानले.