सेवा संकल्प अंतर्गत अधिकाऱ्यांचा स्वच्छता अभियानात सहभाग
schedule18 Sep 26 person by visibility 21 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सेवा संकल्प अभियान सुरू आहे. या अभियान अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीतर्फे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारीं अधिकारी संतोष जोशी यांच्या उपस्थितीमध्ये कागल तालुक्यातील कसबा सांगाव प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा संकल्प अभियान झाले. प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य तपासणी शिबिर झाले.प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जोशी यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.या अभियान अंतर्गत सरकारी निर्णयाचे वाचन, वृक्षारोपण, स्वच्छता शिबीर, आरोग्य तपासणी, लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप असे उपक्रम राबविले जात आहेत.