Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या राजकारणात शिवसेना ‘मधला भाऊ’! करवीरमध्ये विश्वास पाटील व आमच्याकडे ७७५ ठराव! !सेवा संकल्प अंतर्गत अधिकाऱ्यांचा स्वच्छता अभियानात सहभागपरदेशातील विद्यार्थिनी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी वारणा विद्यापीठातशिवसेनेकडून अजित नरके, अजित पाटील, एस.आर. पाटील, विरेंद्र मंडलीक, अशोक फराकटे, बाजीराव पाटलांचे अर्ज२२ कोटीचा प्रोजेक्ट कर्जाच्या माध्यमातून उभारणार, जिपच्या स्थायी समितीत ठरावकाँग्रेसकडून बाबासो चौगुले, अभिजीत तायशेटे, प्रकाश पाटील, रामराज कुपेकर, सचिन घोरपडे, राहूल देसाई, अंजना रेडेकरांचे अर्जराष्ट्रवादीकडून गोकुळसाठी राजेश पाटील, अरुण डोंगळे, रणजितसिंह पाटील, प्रा. किसन चौगले, वसंतराव धुरे, सतीश पाटलांचे अर्जजनसुराज्यकडून गोकुळसाठी अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, सिदगोंडा पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल अजून लोकसभा - राज्यसभा- आमदारकी- विधानपरिषद शिल्लक , बघू या काय काय होते: अरुण डोंगळेविश्वास पाटील यांचे दोन गटातून अर्ज दाखल ! सुरेश देसाई, सुरेश कुराडेंनी भरला उमेदवारी अर्ज !!

जाहिरात

 

परदेशातील विद्यार्थिनी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी वारणा विद्यापीठात

schedule18 Sep 26 person by visibility 25 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : वारणा विद्यापीठाचे अग्रणी महाविद्यालय तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (टीकेआयईटी), वारणानगर येथे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोझांबिक देशातील विद्यार्थिनी शिलुवाह सेलिया लुसियानो उआंबा हिने संगणक विज्ञान व अभियांत्रिकी  या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. परदेशी नागरिक प्रवर्गातून झालेल्या या प्रवेशामुळे टीकेआयईटीच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समुदायात भर पडली आहे. शिलुवाह हिचा प्रवेश १३ सप्टेंबर २०२६ रोजी निश्चित  झाला आहे. टीकेआयईटीमध्ये परदेशी विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग हा संस्थेच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी, प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे आणि अॅडमिशन इन्चार्ज डॉ. अमोल पाटील यांनी शिलुवाह हिचे अभिनंदन व स्वागत केले. याप्रसंगी संग्राम दळवी, उदय पाटील, पंडीत जाधव उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes