तरुणींशी अश्लिल वर्तन, कनिष्ठ लिपिक निलंबित
schedule07 Oct 25 person by visibility 491 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील कनिष्ट लिपिक निलेश म्हाळुंगेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. म्हाळुंगेकर यांच्या विरोधात मुख्यमंत्री युवा कार्य योजनेतील युवतीने तक्रार दिली आहे. अश्लिल वर्तन केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. त्या तक्रारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी मंगळवारी सायंकाळी म्हाळुंगेकर यांना निलंबित केले. म्हाळुंगेकर हे जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य योजनेतील युवती शिक्षण विभागात कार्यरत होती. अकरा महिन्यासाठी तिची नेमणूक होती. तिच्या नेमणुकीच कालावधी २९ सप्टेंबर रोजी संपला. दरम्यान त्या युवतीने, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे म्हाळुंगेकर यांच्या विरोधात तक्रार दिली. सोमवारी हा तक्रार अर्ज सीईओंना प्राप्त झाला. मंगळवारी, दिवसभर या प्रकाराची चौकशी घेऊन म्हाळुंगेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अश्लिल शब्दांचा वापर, लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे