कोल्हापुरातील रस्ते दुरुस्तीसंबंधी बारा ठेकेदारांना दंडासहित नोटिसा
schedule08 Nov 23 person by visibility 276 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यावरुन महापालिका प्रशासनाने बारा ठेकेदारांना दंडासहित नोटिसा लागू केल्या आहेत. यापूर्वी केलेले जे रस्ते दोषदायीत्व कालावधीमध्ये आहेत त्या रस्त्यांच्या ठेकेदारांना दोषदायीत्व कालावधीत रस्ते पुर्ण करण्यासाठी चारही विभागीय कार्यालयामार्फत नोटिसा लागू केल्या आहेत.
अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी मंगळवारी मिरजकर तिकटी ते नंगिवली चौक येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या ठिकाणी अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईनच्या खुदाईच्या कामानंतर रिस्टोरेशनची कामे केलेली नसलेचे निदर्शनास आले. ती कामे त्वरित सुरू करणेबाबत संबंधीत कंपनीला सूचना दिल्या. या ठिकाणी उद्यापासून काम सुरू करत असलेचे दास ऑफशोअर चे प्रतिनिधी यांनी सांगितले. यावेळी शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, पाणीपुरवठा विभाग शाखा अभियंता संजय नागरगोजे, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, दास ऑफशोर चे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या मुदतीत ठेकेदारांनी काम पूर्ण न केलेस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन सरकारी निर्णयाप्रमाणे पुढील कारवाई करण्याच्या सक्त सूचना उप-शहर अभियंता यांना दिलेल्या आहेत.
काही ठेकेदारांकडून कामे मंजूर झाली असून सुध्दा कामाचा करार न केलेने वर्कऑर्डर दिली नसल्याचे दिसून आले असून अशा ठेकेदारांनी पुढील दोन दिवसात कामांचा करर न केलेस त्यांच्यावर कारवाई करुन कामे रद्द करुन फेर निविदा करण्यात येतील असेही महापालिकेने म्हटले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेस राज्य सरकार व जिल्हा नियोजन समितीकडून रस्तेसाठी निधी उपलब्धतेप्रमाणे निविदा काढून काम पूर्ण करुन घेण्याची कार्यवाही होते. सद्य स्थितीत उपलब्ध झालेल्या निधीमधून अंदाजे १९९ कामे प्रस्तावित आहेत. यापैकी १४० कामांच्या वर्कऑर्डर झालेल्या आहेत. ३२ कामे सुरु असून ९ कामे पूर्ण आहेत. उर्वरीत कामे सुरु करण्याच्या सक्त सूचना विभागीय कार्यालय व ठेकेदारांना केल्या आहेत.