उद्योजक रवींद्र माणगावे यांचा भाजपात प्रवेश
schedule19 Nov 25 person by visibility 14 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील उद्योजक रवींद्र माणगावे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. यांच्या उपस्थितीने हा क्षण अधिक अर्थपूर्ण ठरला. या सोहळ्यास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेश महामंत्री राजेश पांडे, उद्योगक्षेत्रातील मान्यवर संतोष मंडलेचा आदींची प्रमुख उपस्थिती होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्यात ‘उद्योगविकास’, ‘ग्रामविकास’ आणि ‘तरुण उद्योजकता’ या तीनही क्षेत्रांना मिळालेल्या नवसंजीवनीमुळे रवींद्र माणगावे प्रखरपणे प्रेरित झाले. विशेष म्हणजे, “गाव तिथे उद्योजक” हा त्यांचा मुख्य ध्यास—गावागावात उद्योगनिर्मिती घडवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणे—याला राजकीय व्यासपीठावरून वेग मिळावा, ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे.