समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत, जनता निवडणुकीत धडा शिकवेल – व्ही. बी. पाटील
schedule19 Nov 25 person by visibility 17 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे व मंत्री हसन मुश्रीफ यांची कागल नगरपालिकेतील युती ही भाजप व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती आहे. घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सदस्य व पदाधिकारी नाहीत. त्यांचा आणि पक्षाचा काही संबंध नाही. अशा पुढाऱ्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवतील’ अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी केली. कागल नगरपालिका निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित घाटगे यांची युती झाली आहे. गेली विधानसभा निवडणूक घाटगे यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढविली होती. कागल नगरपालिका निवडणूक ते छत्रपती शाहू आघाडी म्हणून लढवित आहेत. या पार्श्वभूमीवर व्ही. बी. पाटील म्हणाले, ‘घाटगे हे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षात आले होते. एका वर्षापुरती सदस्य फी भरुन ते सदस्य झाले. त्यानंतर ते सदस्य व पदाधिकारी नाहीत. त्यांनी मुश्रीफ यांच्यासोबत युती करण्याचा घेतलेला निर्णय हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा होत नाही. वरिष्ठ पातळीवरील दबावामुळे मुश्रीफ व घाटगे यांची युती झाली आहे. कागलमधील युती ही घाटगे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाची वाट आहे.’