शिरोली एमआयडीसीत युवा उद्योजकात मारहाण, मोटारीची तोडफोड
schedule19 Nov 25 person by visibility 27 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिरोली एमआयडीसी परिसरात दोन युवा उद्योजकात किरकोळ वाद झाला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या वादाचे रुपांतर मारहाण व मोटारीची तोडफोड करण्यापर्यंत गेले. या प्रकरणी शिरोली पोलिस ठाण्यात उद्योजक अमर प्रताप पाटील (पाटील गल्ली, शिरोली पुलाची) व रोहित बोडके (कोल्हापूर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोघांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. पोलिसांत दाखल तक्रारीतील माहिती अशी, ‘पाटील हे मोटारसायकल रस्त्यात थांबवून मोबाइलवर बोलत होते. त्याचवेळी बोडके हे चारचाकीतून आपल्या कंपनीकडे निघाले होते. बोडके यांनी पाटील यांना मोटारसायकल बाजूला घे असे बजावले. त्यावर बोडके यांनी मी रस्त्याच्याकडेला उभा राहून बोलत आहे असे उत्तर दिले. दोघांमध्ये वादावादी वाढत गेली. बोडके यांनी, पोलिसांत पाटील यांच्याकडून शिवीगाळ व मारहाण झाली. तसेच मोटारीची काच फोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत बोडकेंनी मारहाण व शिवीगाळ केल्याचे म्हटले.