+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !! adjustनरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा ! राजेश क्षीरसागरांची माहिती adjustस्टोरीमॅप स्पर्धेत विद्यापीठाचे अभिजीत पाटील विजेते ! बांदिवडेतील अग्निस्तंभावर आधारित विषय !! adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा!
Screenshot_20240226_195247~2
schedule01 Apr 23 person by visibility 525 categoryआरोग्य
डॉ. उषादेवी कुंभार यांनी स्विकारला पुरस्कार
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टांची १०० टक्के पूर्तता केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड होवून जिल्ह्याला चौथा क्रमांक मिळाला. यासाठीचा पुरस्कार नुकताच आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत तसेच जे. जे. वैद्यकीय महाविद्यालय, मुंबईचे प्राध्यापक डॉ. ललित संख्ये, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था, मुंबईचे संचालक डॉ. सुनिल गिते व पी एच एस जी - 1 ए एच ओ मुंबईचे डॉ. विजय भगत यांच्याहस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालक डॉ. उषादेवी कुंभार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच उत्कृष्ट अवैद्यकीय पर्यवेक्षक अनिल शास्त्री, अवैद्यकीय सहाय्यक डी. एम. मंदुळकर तसेच सांख्यिकी सहाय्यक निशांत कुंदे यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन २०२२-२३ वर्षामध्ये नवीन कुष्ठरुग्ण शोध कार्य उद्दिष्टांची पूर्तता तसेच विकृती दर्जा दोनच्या रुग्णांचे प्रमाण कमी असणे, लहान वयातील मुलांची रुग्ण संख्या कमी असणे तसेच विकृती असलेल्या रुग्णांना भौतिकोपचार व त्यांना आवश्यक असलेल्या सेवा १०० टक्के पुरवण्यात आल्या बद्दलजिल्ह्याला हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.
  कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रथमच पुरस्कार मिळाल्यामुळे ही बाब अभिमानाची असून यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. उषादेवी कुंभार यांनी परिश्रम घेतले.