घाटगे् ग्रुपतर्फे मंगळवारी नादब्रह्म सांगितीक कार्यक्रम
schedule08 May 23 person by visibility 213 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : घाटगे ग्रुपचे संस्थापक वसंतराव घाटगे यांच्या जयंतीनिमित्त ९ मे हा दिवस फौंडर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. फौंडर्स डे व माई ह्युंदाईच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंगळवारी (९ मे २०२३) ‘नादब्रह्म’ प्रस्तुत ‘सुशीर आनंद’ या बासरी व ताल वाद्यांची जुगलबंदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माई ह्युंदाई, जीपीटी कॉम्प्लेक्स् हॉटेल ओपल समोर येथे सायंकाळी ६.३० वाजता कार्यक्रम होणार आहे. या संगीतमय कार्यक्रमात नादब्रह्मचे २५ हून अधिक वादक आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका माई ह्युंदाई येथे उपलब्ध आहेत असे संयोजकांनी कळविले आहे.