नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद अष्टेकर, कार्याध्यक्षपदी आनंद कुलकर्णी
schedule03 Jul 25 person by visibility 41 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद अष्टेकर यांची निवड करण्यात आली होती. नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेची बैठक नुकतीच झाली या बैठकीत कार्यकारणी निवडण्यात आली. कार्याध्यक्षपदी आनंद कुलकर्णी, उपाध्यक्षपदी जितेंद्र देशपांडे, प्रमुख कार्यवाहपदी गिरीश महाजन, कोषाध्यक्षपदी राकेश कापशीकर यांची निवड झाली. सहकार्यवाहपदी संजय पाटील कोलोलीकर, हेमुसुवर्णा मिरजकर यांची निवड झाली. पदाधिकारी निवडीनंतर कार्यकारणीतील सदस्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष प्रशांत दामले यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नियामक मंडळ सदस्य समीर हम्पी उपस्थित होते.