+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे
1000255522
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Apr 24 person by visibility 513 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  शिष्यवृत्ती परीक्षा मधील राज्यस्तर, जिल्हास्तर,  कोल्हापूर महापालिकेच्या छत्रपती राजर्षी शाहू शिष्यवृत्ती परीक्षा, कोल्हापूर प्रज्ञाशोध परीक्षा मधील यशवंत विद्यार्थीचा सत्कार सोहळयाचा कार्यक्रम  गुरुवारी रंगला. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला. 
 संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे कार्यक्रम झाला.  यावेळी विविध परीक्षेतील गुणवंत ९१४ विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार ट्रॉफी व मेडल देवून करण्यात आला. तसेच ७२ व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा सन २०२३-२४ मधील सर्वसाधारण विजेता पदाची आकर्षक ट्रॉफी मनपा लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर या शाळेस प्रदान करण्यात आली. यावेळी केशव जाधव यांचे लिखित अक्षरब्रम्ह या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. 
साहित्यिक प्राचार्य जी. पी. माळी, तत्कालिन अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, उपायुक्त साधना पाटील, प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. यावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणीक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, मनपा शिक्षक संघटनेचे सुधाकर सावंत, उमेश देसाई, संजय पाटील, विलास पिंगळे, राजेंद्र पाटील, दिलीप माने,  लक्ष्मण यादव यांचे हस्ते यशवंत ९१४ विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अजय गोसावी, अविनाश लाड, शांताराम सुतार उपस्थित होते.
 प्रशासनाधिकारी यादव यांनी प्रास्ताविक केले.  कार्यक्रमाचे नियोजन प्रभारी कनिष्ठ लिपिक संजय शिंदे यांनी केले. आर.जी. किर्तीकर, सारिका पाटील, मनीषा पांचाळ यांनी सूत्रसंचालन  केले. उशैक्षणीक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांनी आभार  मानले.