Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांचे पॅनेल विजयी, 17 पैकी सोळा जागा जिंकल्यामहामानवांच्या विचारकार्यांचे नियोजनबद्ध संशोधन व्हावे - पालकमंत्री प्रकाश आबिटकर वीरशैव लिंगायत समाजातर्फे गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कारविकास प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव…नांगरट साहित्य संमेलनात सरकारी धोरणावर ओढले आसूडकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेच्या भोगावती शाखेचा प्रथम वर्धापनदिन साजरागोकुळमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजराचित्रपट महामंडळासाठी कोल्हापूर-पुण्यात चुरशीने मतदान, सोमवारी मतमोजणीडॉ. जे. के. पवार लिखित राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशनविद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता समजून घेत पालकांनी स्वप्नांना पाठबळ द्यावे - सचिन मेननशिवराज्याभिषेक दिन सोहळयानिमित्त मराठा महासंघातर्फे मिरवणूक

जाहिरात

 

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांचे पॅनेल विजयी, 17 पैकी सोळा जागा जिंकल्या

schedule08 Jun 26 person by visibility 680 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत निर्माते मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने बाजी मारली. 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात समर्थ पॅनेलने विरोधी चित्रकर्मी पॅनेलवर दणदणीत विजय मिळवला. महामंडळाच्या एकूण 17 जागेसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी तीन जागा  बिनविरोध झाल्या होत्या. तर 14 जागेसाठी थेट लढत झाली होती. या 14 पैकी चौदा जागा जिंकत निर्माते मेघराजे राजेभोसले यांनी महामंडळावरील वर्चस्व  पुन्हा एकदा शाबित केले. काही विभागात ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. चाळीस ते पन्नास मतांचा फरक होता यामुळे शेवटपर्यंत उत्सुकता ताणली गेली.
  विरोधी चित्रकर्मी पॅनलमधील अभिनेते आनंद काळे,  लेखक पितांबर काळे,  निर्माते गणेश तळेकर, दिग्दर्शक सतीश रणदिवे, कला दिग्दर्शक सतीश बिडकर, निर्माते विजय शिंदे, रणजीत जाधव या प्रमुख मंडळांनाही पराभव पत्करावा लागला. 14 जागेपैकी विरोधी चित्रकर्मी  पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.  निवडणुकीमध्ये 16 अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते मात्र सभासद मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल दिला.
 समर्थ पॅनेलमध्ये निर्माता गटातून मेघराज भोसले 951 मते, सुनील महाजन 786 मते हे विजयी झाले. दिग्दर्शक गटातून दीपक कदम 846 , अजित शिरोळे 756 मते , लेखन गटातून राज काजी 850 मते, अभिनेता गटातून सुशांत शेलार 891 मते,  छायाचित्रण गटातून धनाजी यमकर 952 मते, नृत्य विभागातून सुभाष नकाशे 892 मते, ध्वनिरेखन गटातून  शरद चव्हाण 975 मते, कलादिग्दर्शन गटातून प्रवीण पाटील 885 मते, रंगभूषा गटातून चैत्राली डोंगरे 998 मते, निर्मिती व्यवस्थापक गटातून रवींद्र गावडे 910 मते,  वितरण विभागातून गणेश गारगोटे 907 मते आणि कामगार विभागातून विकास तोरणे  886 मते घेत  निवडणूक जिंकली.
 सत्ताधारी मेघराज भोसले यांच्या विरोधात चित्रकर्मी  पॅनेल साकारले आहे. चित्रकर्मी पॅनलमध्ये निर्माता गटातून उमेदवार विजय शिंदे ( प्राप्त मते 598) , गणेश तळेकर 677 मते,  दिग्दर्शक गटातून विजय राणे 556 मते , सतीश रणदिवे 712 मते,  लेखक गटातून पितांबर काळे 815 मते,  अभिनेता गटातून आनंद काळे 631 मते, छायाचित्रण गटातून महेश देशपांडे,  निर्मिती व्यवस्थापक गटातून मिलिंद अष्टेकर 680 मते , ध्वनी यंत्रणा गटातून निलेश बुट्टे 680 मते, रंगभूषा गटातून सदानंद सूर्यवंशी 655 मते, प्रसिद्धी वितरण गटातून प्रकाश जाधव 618, नृत्यदिग्दर्शक गटातून अनिल सुतार 544 मते, कला - प्रसिद्धी विभागातून सतीश बिडकर 722 आणि कामगार गटातून रणजीत जाधव 742 मते यांना पराभव सहन करावा लागला.
 चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीकरिता अपक्ष उमेदवारामध्ये निर्माता गटातून मानसिंग कदम 25 मते , प्रकाश पाटील 09 मते, महादेव शिरोळकर 54 मते, भगवान मैदनकर यांना सहा मते मिळाली. दिग्दर्शक गटात  सुनील घोरपडे 79 मते, अवधूत जोशी 51 मते, अमोल भावे 64 मते, अमरसिंह जगदाळे चार मते,  धर्मेद यादव सात मते, उमेदवार आहेत. अभिनेता गटात आदित्य सिंघानिया 54 मते, अशोक जाधव सात मते, संतोष शिंदे यांना 53 मते मिळाली.कला दिग्दर्शक गटात उल्हास भालचंद्र नांद्रे 48 मते,  नृत्य दिग्दर्शक  गटात संग्राम भालकर यांना 216 मते मिळाली. निर्मिती व्यवस्था –व्यवस्थापकीय यंत्रणा गटात  मनोज मराठे यांना 57 मते मिळाली. साऱ्या अपक्ष उमेदवारांना हार पत्करावी लागली. दरम्यान अभिनेत्री गटातून अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर संकलक गटातून विजय खोचीकर व गायन गटातून गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले आहेत. खोचीकर आणि गायक शिंदे हे समर्थ पॅनलचे उमेदवार आहेत. तर अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा चित्रकर्मी  पॅनलच्या प्रमुख मंडळी समावेश होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes