+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Screenshot_20240226_195247~2
schedule22 May 23 person by visibility 200 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठी नाटकं, सिनेमा आणि मालिकांमधून वेगवेगळया भूमिका साकारत प्रेक्षकांची आवडती ठरलेली अभिनेत्री मधुरा वेलणकर पाच वर्षानंतर पुन्हा एकदा ‘बटरफ्लाय‘हा सिनेमा घेऊन भेटीस येत आहे. दोन जून २०२३ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अभिजीत साठम, दिग्दर्शिका मीरा वेलणकर व अभिनेत्री मधुरा वेलणकर सोमवारी (२२ मे) कोल्हापूरला आले होते.
याप्रसंगी बोलताना अभिनेत्री वेलणकर यांनी, ‘बटरफ्लाय सिनेमातील मेघा देशपांडे ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमातील मेघा ही कोल्हापुरची आहे. दैनंदिन आयुष्य जगताना एके दिवशी तिच्या जीवनात एक रंजक गोष्ट घडते. ज्यामुळे तिचं दैनंदिन आयुष्य बदलून जाते. तिला सापडलेल्या एका नवीन वाटेला आणि स्वत:ला ती अधिक प्राधान्य देते. आयुष्याला लखलख लाईटिंग झाल्यामुळे कोषातून बाहेर पडून जगणाऱ्या तिची गोष्ट म्हणजेच बटरफ्लाय होय. मेघा देशपांडेची भूमिका साकारताना कोल्हापुरी टच लाभावा म्हणून काही दिवस कोल्हापुरात राहिले. अनेक गोष्टी शिकल्या. मुळात सिनेमा, नाटक यामुळे कोल्हापूरशी सहवास होताच. मुळात कोल्हापूर हे माझ्या मामांचे गाव आहे. या शहराविषयी वेगळं अप्रूप आहे. बटरफ्लाय सिनेमाचं कोल्हापुरातून प्रमोशन करताना वेगळा आनंद आहे.’
या सिनेमातील ‘कोरी कोरी झिंग हाय गं‘हे रंजक शब्द असलेले गीत लाँच करण्यात आले. गायिका वैशाली भैसने माडे हिच्या आवाजात गाणे रेकॉर्ड केले आहे. या सि्नेमाची संकल्पना मधुरा वेलणकर यांची. त्यांच्या संकल्पनेला विभावरी देशपांडे यांनी कथेत बांधले. विभावरी देशपांडे, मीरा वेलणकर यांनी पटकथा लेखन तर कल्याणी पाठारे,आदित्य इंगळे यांनी संवाद लेखन केले आहे. वैभव जोशी यांची गाणी आहेत. शुभजित मुखर्जी यांनी संगीत दिले आहे. वासुदेव राणे यांनी छायांकन केले आहे. सिनेमात महेश मांजेरकर, राधा धारणे, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर अशी स्टारकास्ट आहे. मीरा वेलणकर यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा. अभिनेता अभजित साठम यांनी सिनेमातील भूमिकेविषयी सांगितले. हा सिनेमा साऱ्यांना आवडेल असा विश्वास सिनेमाच्या टीमने व्यक्त केला.