कोल्हापुरात कॅन्सरविरोधात महिलांची वैद्यकीय मोहिम, ५०० तरुणींना प्रतिबंधात्मक लस
schedule25 Mar 23 person by visibility 477 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कॅन्सरग्रस्तांची वाढती संख्या ही साऱ्यांच्याच चिंतेचा विषय ठरला आहे. विशेषत : महिलामधील कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महिलांच्या गर्भाशयात होणाऱ्या कॅन्सरविरोधात प्रबोधन व प्रतिबंधात्मक उपचारासाठी कोल्हापुरात महिलांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी प्रतिबंधात्मक लस देण्याचा वैद्यकीय उपक्रम हाती घेतला आहे.
कोल्हापुरातील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लाई, कविता घाटगे आणि प्रिती मर्दा यांनी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या पुढाकाराने मोफत प्रतिबंधक लस देण्याची मोहीम राबविण्याची सुरूवात केली. रोटरीच्या माध्यमातून ५०० तरुणींना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ गार्गीस यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम झाला. कॅन्सर पेशंट ऍड असोशियन इंडिया एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर, रिसर्च स्टडीज ॲडिशनल प्रोजेक्टचे डॉ. धनंजया सारनाथ यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यातून ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या अध्यक्षा कविता घाटगे म्हणाल्या, “युवतींना कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यात ५०० तरुणींना ही लस देण्यात आली. भविष्यकाळातही हा उपक्रम सुरू राहील.”
या वैद्यकीय सेवेसाठी यशोमंगल ट्रस्टच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ.राधिका जोशी,कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लाई, सनराइज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,हिरकणी फाउंडेशनच्या जयश्री शेलार, कविता घाटगे, डॉ. वैदेही टोके, भावना शर्मा, प्रिया प्रसाद, गीता हसुरकर, वर्षा कुराडे, वनिता संस्थेच्या अनुराधा संकपाळ यांचे सहकार्य लाभले.
यावेळी मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. ए.बी पाटील, डॉ. राजेंद्र वायचळ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, डॉ. प्रिया शहा, डॉ. नंदकुमार जोशी,डॉ. जयदीप जोशी,डॉ. हेमा दातार उपस्थित होते.