Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डिबेंचर कपातीच्या विरोधात 16 ऑक्टोबरला जनावरासहित गोकुळवर मोर्चागोकुळ कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस मदतस्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूरमध्ये सोळा ऑक्टोबरला ऊस परिषदश्रुती सुनील कुलकर्णी यांचे निधनगंगावेस येथील बाजारपेठेत ओमनी कार घुसली ! भाजी विक्रेती महिला ठार, दोघी जखमी !!अक्षयकुमारची कोटीची मदत, केडीएमजीचा पुढाकार ! कुरुंदवाडला उभारणार कन्या शाळा !!वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात मोर्चा, भाजप सरकारविरोधात घोषणाबाजीराज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धेचा समारोप दिमाखातमहिनाभरात कोल्हापूरच्या विकासाचे नवे मॉडेल, टीडीआरसंबंधी एसओपी ! सिमेंटच्या रस्त्यांचा प्रस्ताव, प्रॉपर्टी कार्डचा विषय ऐरणीवर !!जिप आरक्षणात उलटफेर ! इंगवले, घाटगे, महाडिक, निंबाळकर, पाटील, मगदूमांना धक्का !!

जाहिरात

 

डिबेंचर कपातीच्या विरोधात 16 ऑक्टोबरला जनावरासहित गोकुळवर मोर्चा

schedule14 Oct 25 person by visibility 607 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  डिबेंचर कपातीच्या विरोधात प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादकांच्यावतीने 16 ऑक्टोबर 2025 रोजी जनावरासहित गोकुळ दूध संघावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधीनी सांगितले. सर्किट हाऊस ते ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
किसान संघाचे भगवान काटे, प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी युवराज पाटील, प्रवीण पाटील, प्रमोद पाटील, बाबासो साळुंखे, सर्जेराव धनवडे, शशिकांत कोराणे, प्रताप भीमराव पाटील यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत गोकुळ प्रशासनाकडून दोन दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही तर 16 ऑक्टोबरला मोर्चा काढला जाईल असे सांगितले. पत्रकार परिषद परिषदेमध्ये बोलताना प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी म्हणाले, गोकुळने केलेली डिबेंचर कपात अन्यायकारक आहे. प्राथमिक दूध संस्थांना विश्वासात न घेता हा गोकुळने परस्पर निर्णय घेतला. गोकुळच्या वार्षिक सभेत विषय पत्रिकेवर  विषय न मांडता,  ठराव न करता,  सहकार खात्याची परवानगी न घेता परस्पर डिबेंचर कपात करणे हे चुकीचे आहे. निमाना बगल देऊन डिबेंचर कपात केल्याच्या कारणावरून गोकुळवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. संचालक मंडळ ही बरखास्त होऊ शकते. डिबेंचर कपाती विरोधात रस्त्यावरील लढाई करण्यासह कायदेशीर मार्गाचाही अवलंब करू असे प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधीने सांगितले.
 प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादकांच्यावरती अन्याय करणारा हा निर्णय गोकुळ प्रशासनाने मागे घेऊन कपात केलेली रक्कम परत करावी. कपात केलेली रक्कम चालू आर्थिक वर्षात परत करणे शक्य नसेल तर दूध फरक रक्कम वाढवून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दूध उत्पादक व प्राथमिक दूध संस्थांच्या हिताचा निर्णय व्हावा या विषयांमध्ये गोकुळच्या संचालकांनी ही दूध उत्पादक व प्राथमिक दूध संस्थेसोबत राहावे. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची भेट घेऊन त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारावे अशी आपण त्यांना विनंती करणार आहोत असे प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधीने सांगितले. गोकुळ दूध संघाकडून डिबेंचर कपाती संदर्भात उलट सुलट माहिती दिली जात आहे. प्राथमिक दूध संस्थांना विश्वासात घेतले नाही. असेही दूध संस्था प्रतिनिधी म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes