गोकुळ कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस मदत
schedule14 Oct 25 person by visibility 82 categoryउद्योग

महाराष्ट्रन्यूजवन : गोकुळ दूध संघाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ संघ केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर समाजाभिमुख दृष्टिकोनातूनही आघाडीवर आहे, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर(गोकुळ)कर्मचारी संघटनेतर्फे(आयटक) सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस १३ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मुंबईत मंत्रालयात मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गोकुळ कर्मचारी संघटनेचे कॉम्रेड सदाशिव निकम व कॉम्रेड लक्ष्मण पाटील, कॉम्रेड कृष्णात चौगुले यांनी आज हा धनादेश सुपूर्द केला.
सामाजिक बांधिलकीतून ‘गोकुळ’चा हातभार.....!
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने गोकुळ दूध संघ कर्मचारी संघटनेने सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देऊन निधी उभारला.या निधीतून पूरग्रस्त भागात खालीलप्रमाणे मदत कार्य करण्यात आले मुख्यमंत्री सहायता निधीस थेट योगदान १३ लाख २५ हजार रुपये सोलापूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतील सुमारे १,००० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व शैक्षणिक साहित्याच्या किटचे वाटप त्याची अंदाजे रक्कम १३ लाख रुपये पूरग्रस्त भागातील मुक्या जनावरांसाठी मोफत पशुखाद्याचा पुरवठा अंदाजे ३ लाख रुपये तसेच पूरग्रस्त भागात मोफत ३२०० लिटर दूध १ लाख ५० हजार किमतीचे दूध वाटप करण्यात आले या सर्व उपक्रमांद्वारे गोकुळ परिवाराकडून एकूण सुमारे ३१ लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना दिली आहे.