शालेय फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्र हायस्कूलने जिंकली.
schedule25 Sep 23 person by visibility 874 categoryक्रीडा

१४ वयोगट स्पर्धा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
शहरस्तरीय चौदा वयोगट मुलांची शालेय फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्र हायस्कूलने जिंकली. अंतिम सामन्यात त्यांनी शाहू विद्यालयाचा २-० असा पराभव केला. जिल्हा क्रीडा कार्यालय आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर फुटबॉल स्पर्धा खेळवण्यात आली.
स्पर्धेतील सामन्यांचे निकाल असे,
14 वर्षे मुले उपांत्य सामने - महाराष्ट्र हायस्कूल विजयी विरुद्ध भारती विद्यापीठ 5/0 महाराष्ट्र हायस्कूल कडून सम्राट मोरबाळे 2,संचित उपलांनी 1, पृथवेश बागडीकर 1, राजवीर खराडे 1. छत्रपती शाहू विद्यालय एसएससी स म लोहिया हायस्कूल 2/0 छत्रपती शाहू विद्यालय एसएससी कडून वेदांत गाडगीळ 2.
दरम्यान चौदा वर्षे मुले अंतिम सामना महाराष्ट्र हायस्कूल विजयी विरुद्ध छत्रपती शाहू एसएससी 2/0 महाराष्ट्र हायस्कूल कडून ऋषिकेश हराळे,राजवीर खराडे प्रत्येकी एक गोल
विजयी संघातील नावे अशी , श्लोक माळी,संकेत जाधव,अजय वडर पृथ्वीराज चव्हाण, ध्रुवराज साळुंखे,प्रतीक इंगवले,साईराज पाटील, राजवीर खराडे, संचित उपलानी, सम्राट मोरबळे,ऋषिकेश हराळे, पृथ्ववेश बागडेकर,समर्थ पडळकर साईराज सुतार, वेदांत साळुंखे, आर्यन साठे, प्रशिक्षक प्रदीप साळोखे, संतोष पवार, शरद मेढे,सूर्यजीत घोरपडे, सूर्यदीप माने
चौदा वर्षे मुली सामने निकाल - पोद्दार स्कूल विजय विरुद्ध भाई माधवराव बागल हायस्कूल 3/0 पोद्दार स्कूल कडून ऋतुजा धर्मे,अरीन कांबळे, प्रचिता पाटील प्रत्येकी एक गोल. प्रायव्हेट हायस्कूल विजयविरुद्ध राधाबाई शिंदे ग्लोबल 1/0 प्रायव्हेट हायस्कूल कडून शिवानी राजपूते 1 गोल. एस्तरे पॅटर्न हायस्कूल विजय विरुद्ध न्यू इंग्लिश संभाजीनगर 1/0 एस्टर पॅटर्न कडून नम्रता गावडे 1. उषाराजे हायस्कूल विजय विरुद्ध राधाबाई शिंदे 2/0 उषाराजे कडून संस्कृती तुरके, सई नलवडे प्रत्येकी एक गोल
17 वर्ष मुली सामने निकाल - इंग्लिश संभाजीनगर विजयी विरुद्ध न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल 0/0 ट्रायब्रेकवर 2/1. सेंट झेवियर्स हायस्कूल विजय विरुद्ध भाई माधवराव बागल 0/0 ट्रायबेकवर 2/1.