युवासेनेतर्फे महापुरुष स्मारक स्वच्छता अभियान
schedule03 Feb 24 person by visibility 605 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त शनिवारी युवा सेनेच्यावतीने महापुरुष स्मारक स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत शहरातील महापुरुषांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यात येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या शाहूनगर येथील पुतळ्याच्या स्वच्छतेपासून या अभियानची सुरुवात झाली.
या पुतळ्याभोवती साचलेली घाण, धूळ, तण तसेच वाढलेले गवत काढून टाकण्यात आले. तसेच संपूर्ण परिसर पाण्याने धुण्यात आला.
हा उपक्रम प्रत्येक रविवारी राबवण्यात येणार असून या माध्यमातून महापुरुशांचे विचार जपण्याचा प्रयत्न आहे, तसेच या अभियानात शहरातील नागरिकांनी, सेवाभावी संस्थानी, युवक युवतीनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी केले.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, शिवसेना उपशहरप्रमुख अश्विन शेळके, मंदार तपकिरे, सुनील देशपांडे,युवा सेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण, जिल्हाप्रमुख ॲड. चेतन शिंदे, जिल्हा समन्वयक अविनाश कामते, जिल्हा सरचिटणीस कुणाल शिंदे, रोहित पवार, विश्वदीप साळोखे, युवती सेना शहर प्रमुख नम्रता भोसले, शैलेश साळोखे, सरचिटणीस कपिल पोवार, अभिजीत कदम, विपुल भंडारे, आकाश सांगावकर, ओंकार परमणे, सौरभ कुलकर्णी, निवेदिता तोरस्कर, तेजस्विनी घाडगे, शुभम ठोंबरे, विश्वजीत चव्हाण, शुभम शिंदे, अर्जुन बुचडे, रोहन शिंदे, विनायक गवळी यांचा सहभाग होता.